कोल्हापूरात मविआची ताकद वाढली! एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा
AIMIM support Shahu Maharaj : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शाहू महाराज (Shahu Maharaj) छत्रपती रिंगणात आहेत. तर महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) आखाड्यात आहेत. ही लढत चुरशीची होणार असून आता शाहू महाजाजांना एमआयएमने पाठिंबा दिला आहे.
मुलाच्या नावावरून ट्रोल, महाराजांची भूमिका न करण्याचा चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय!
एमआयएमचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी आज (21 एप्रिल) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी कोल्हापूरच्या जागेसाठी एमआयएम पक्षाची भूमिका स्पष्ट केली. कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांना आमचा पाठिंबा असल्याचे जलील यांनी सांगितले.
कॉंग्रेस जिहादींना पाठीशी घालतेय, मोदींना पाडण्यासाठी मशिदीतून फतवे…; राम सातपुतेंचा आरोप
महाराष्ट्रातील मुस्लिम बहुल समाज हा एमआयएमचा मतदार आहे. कोल्हापुरातही मुस्लिमांची संख्या मोठी आहे. दरम्यान, एमआयएमच्या पाठिंब्यामुळे एक प्रकारे शाहू महाराजांची ताकद वाढणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी शाहू महाराजांना 220 माजी नगरसेवक आणि 17 माजी महापौरांनी पाठिंबा दिला. तर आता एमआयएमने पाठिंबा दिला आहे.
वंचितनेही दिला पाठिंबा
वंचित बहुजन आघाडीने वेगवेगळ्या मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरातून उमेदवार दिलेला नाही. येथे त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दलित आणि मुस्लीम वर्ग शाहू महाराजांसोबत असणार आहे.
दरम्यान, महायुतीने कोल्हापूरच्या जागेवर महायुतीने संजय मंडलिक यांना तिकीट दिले आहे. ही जागा जिंकण्यासाठी ते पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यात थेट लढत होणार आहे. मंडलिक यांचा विजय निश्चित करण्यासाठी महायुतीने या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा कामाला वाली आहे. तर शाहू महाराजांना विजयी करण्यासाठी महाविकास आघाडी एकजुटीने प्रचार करत आहे. त्यामुळं कोल्हापूरमध्ये विजयाचा गुलाल कोण उधळतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.