आता सॅटेलाईटच्या माध्यमातून टोल घेणार; प्रवाशांसाठी गडकरींनी सांगितला मास्टर प्लॅन

आता सॅटेलाईटच्या माध्यमातून टोल घेणार; प्रवाशांसाठी गडकरींनी सांगितला मास्टर प्लॅन

Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोल टॅक्सबद्दल (Toll taxमोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार टोल रद्द करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. आज नागपूरमध्ये (Nagpur)एका वृत्तसंस्थेशी बोलताना गडकरी यांनी यावर भाष्य केले.

सुजय विखे-लंकेंचं पुन्हा सुरु! ‘शोले’चा किस्सा सांगत विखेंकडून खिल्ली…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, आता आम्ही टोल रद्द करणार आहोत. आता हे काम सॅटेलाईटच्या आधारे केले जाणार आहे. आम्ही टोलचे काम हे सॅटेलाईट थ्रू करणार आहोत.


पवारांची पॉवर! भाजपला धक्का, मोहिते पाटील हाती घेणार ‘तुतारी’; ‘माढ्या’चा शिलेदारही फिक्स?

जेवढी गाडी रस्त्यावर चालणार तेवढेच पैसे थेट तुमच्या खात्यातून कापले जातील. कोणत्या व्यक्तीने किती किलोमीटर प्रवास केला त्यानुसार त्याचे शुल्क आकारले जाणार असा दावा केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दावा केला आहे की, टोल सॅटेलाईट थ्रू कट झाल्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होणार आहे. यापूर्वी मुंबई ते पुणे हा प्रवास करण्यासाठी नऊ तासांचा वेळ लागत होता. आता मात्र ते अंतर फक्त दोन तासांत पूर्ण करता येते.

मंत्री गडकरी यांनी यापूर्वी 18 मार्च 2024 रोजी सांगितले होते की, केंद्र सरकार पुढील पाच वर्षांत सर्व शहरांमध्ये आणि दिल्ली-शिमला, दिल्ली-चंडीगड तसेच मुंबई-पुणे यासारख्या काही लांब मार्गांवर इलेक्ट्रिक बस सुरु करण्याची योजना आखत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube