महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच! संजय शिरसाट म्हणाले, ‘या’ पाच जागांवर शिवसेनेचाच दावा

महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच! संजय शिरसाट म्हणाले, ‘या’ पाच जागांवर शिवसेनेचाच दावा

Sanjay Shirsat On Mahayuti seat Allocation : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. मात्र, महायुतीचे (Mahayuti) जागावाटप अद्याप निश्तिच झाले नाही. ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि संभाजीनगर या जागांवर शिवसेनेचे खासदार आहेत. मात्र, या जागांवर अजित पवार गट आणि भाजपने दावा ठोकला. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसा (Sanjay Shirsat) यांनी या जागावाटपासंदर्भात भाष्य केलं.

लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! बबनराव घोलपांचा शिंदे गटात प्रवेश 

सीएम शिंदे यांनी आज शिंदे गटाच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना शिरसाट म्हणाले की, शिवसेनेच्या एकदोन मतदारसंघाबाबत तडजोड झाली आहे. पण इतर मतदारसंघावरही आम्ही लक्ष केंद्रीत केलं. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत महायुतीच्या जागावाटपात नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणच्या जागा शिवसेनेला मिळाल्या पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. महायुतीतील जागा वाटपांचा पेच अजून सुटलेला नाही. पण, ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि संभाजीनगर या जागांचा आज-उद्या तिढा सुटेल, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.

बबनदादा, संजयमामा, कल्याणराव अन् परिचारक फडणवीसांच्या बंगल्यावर : मोहिते पाटील चेकमेट होणार? 

मोदींना पंतप्रधान करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत, त्यांनी जो आदेश दिला, तो आम्ही पाळू. आजच्या बैठकीत तिन्ही पक्षांनी एकत्र काम करण्याबाबत सखोल चर्चा झाली. मोदींना पंतप्रधान करायचं आहे. त्यामुळे सर्व विधानसभा मतदारसंघात एकदिलाने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे ते म्हणाले.

यावेळी बोलतांना त्यांनी एकनाथ खडसेंच्या भाजप पक्षप्रवेशावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, एकनाथ खडसेंना आपला पक्ष फक्त आपलाच आहे, हे लक्षात आले असावे, त्यामुळे ते पुन्हा भारतीय जनता पक्षात येत आहेत. एकनाथ खडसे जर महायुतीसोबत परत आले तर त्यामुळं कोणत्याच पक्षातील कोणाही नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. झाला तर खडसेंमुळं महायुतीला फायदाच होईल, असं शिरसाट म्हणाले.

राज ठाकरेंसाठी रेड कार्पेट टाकू….
शिरसाट यांनी राज ठाकरेंची आज भेट घेतली. यावर बोलतांना ते म्हणाले की, राज ठाकरे हे वरिष्ठ नेते आहेत. ते महायुतीत सामील होणार की, नाही याबाबत बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही. मात्र ते आले तर त्यांचे स्वागत होईल. साहेब तुम्ही महायुतीत आलं पाहिजे, तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकणाऱ्यांमध्ये आम्ही असू, असं आम्ही आधीपासूनच सांगत आलोय. उघडपणे बोलत आलोय, ते महायुतीत आले तर ताकदीचा वेगळा परिणाम जाणवेल आणि सीट निवडून येतील, असं शिरसाट म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube