TMC चं एक्झिट पोलला सडेतोड उत्तर; पाहा पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या कोण-कोणत्या उमेदवारांनी मारली बाजी
Exit Poll Failed See Which TMC Candidate Won : देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election Result) जाहीर होत आहे. देशातील अनेक राज्यांत एनडीएला धक्का बसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्यात तृणमूलच्या ममता बॅनर्जींचा पश्चिम बंगाल देखील अपवाद नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजप पिछाडीवर तर टीएमसी आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये 42 जागांसह भाजप 12, टीएमसी 29, कॉंग्रेस 1 अशी आघाडीवर असलेल्या जागांची आकडेवारी आहे.
पुण्याची जागा भाजपचीच! बापटांनंतर मोहोळांच्या हाती कमान, धंगेकरांचा पराभव
दरम्यान निवडणुक निकालांच्या आदल्या दिवशी आलेल्या एक्झिट पोलमध्ये मात्र भाजपला 28 ते 31 जागा येतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर टीएमसीला 11 ते 14 जागा मिळतील असं सांगण्यात येत होतं. मात्र टीएमसीने एक्झिट पोलला सडेतोड उत्तर दिलं असल्याचं चित्र आजच्या निकालामध्ये समोर आलं आहे. कारण टीएमसी पुढे आहे.
दहा वर्षांनंतर भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा पंजा; गुजरातेत एका जागेवर काँग्रेसची आघाडी
यामध्ये डायमंड हार्बरमध्ये टीएमसीचे अभिषेक बनर्जी आघाडीवर आहेत. ते 5,31,362 मतांच्या आघाडीने विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. कारण अद्याप मतमोजणी सुरू आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत बनर्जीला 7,18,189 मतं मिळाली तर विरोधी भाजपचे उमेदवार अभिजीत दास 1,86,827 मतांनी मतं मिळाली होती.
नुरुलमध्ये इस्लाम बसीरत पुढे आहेत. बर्धमान पुरबामध्ये टीएमसीच्या शर्मिला सरकार पुढे आहेत. येथे भाजपचे दिलीप घोष जवळपास 3,000 मतांनी पिछाडीवर आहे. जादवपुरमध्ये टीएमसीच्या सायोनी घोष 1777 मतांनी पुढे आहेत. महुआ मोइत्रा जवळपास 3000 मतांनी मागे आहेत. महुआ मोइत्रा टीएमसीच्या कृष्णानगरच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात अमृता रॉय उभ्या आहेत. या महत्त्वाच्या जागांसह पश्चिम बंगालमध्ये 42 जागांसह भाजप 12, टीएमसी 29, कॉंग्रेस 1 अशी आघाडीवर असलेल्या जागांची आकडेवारी आहे.