यवतमाळच्या सभेत नितीन गडकरींना भोवळ; औषधोपचार घेऊन परतले अन् ठोकलं दमदार भाषण

  • Written By: Published:
यवतमाळच्या सभेत नितीन गडकरींना भोवळ; औषधोपचार घेऊन परतले अन् ठोकलं दमदार भाषण

Union Minister Nitin Gadkari faints during speech in Maharashtra’s Yavatmal : यवतमामध्ये आयोजित जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भोवळ आल्याने एकच गोंधळ उडाला. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ पुसदच्या शिवाजी मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करत असताना गडकरींना (Nitin Gadkari) अचानक भोवळ आली. यावेळी एकच गोंधळ उडाला. गडकरींना तातडीने जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर काहीवेळ आराम करून आणि औषधोपार करून गडकरी पुन्हा सभास्थळी हजर झाले आणि उपस्थितांना संबोधित करत दमदार भाषण केले.

‘मैदान कोणतंही ठेवा, जीत हमारी होंगी’; बच्चू कडूंच्या भाषणाची सुरुवातच नवनीत राणांपासून

यवतमाळमध्ये आजचे तापमान अधिक होते. त्यात लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात सभांचे आयोजन केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यावेळी गडकरी उपस्थितांना संबोधित करण्यासाठी मंचावर उभे राहिले त्याचवेळी अचानक त्यांना भोवळ आली आणि ते कोसळले. त्यावेळी गडकरींच्या अंगरक्षकांनी प्रसंगावाधान दाखवत गडकरींना संभाळले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. यानंतर गडकरींना तातडीने उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

अमरावतीमध्ये शेतकऱ्यांसाठी अन् महिलांसाठी राहुल गांधींच्या मोठ्या घोषणा, म्हणाले, आम्ही लोकांना लखपती बनवणार…

गडकरींना भोवळ येण्याची पहिली वेळ नाही

नितीन गडकरी यांना भर सभेत भोवळ येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील त्यांना उन्हामुळे भोवळ आल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आजही त्यांना भर मंचावर भाषण करत असताना भोवळ आली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमामध्ये गडकरींना भोवळ आली होती. याशिवाय डिसेंबर 2018 साली राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमातही गडकरींना भोवळ आली होती. त्यानंतर 2019 साली शिर्डीतील एका कार्यक्रमामध्ये स्टेजवरच असतानाच भोवळ गडकरींना भोवळ आली होती.

औषधोपचार करून गडकरी पुन्हा मंचावर

गडकरींना भरसभेत भोवळ आल्याने एकच गोंधळ उडला होता. त्यानंतर त्यांना तात्काळ जवळील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तेथे काहीकाळ आराम आणि औषधोपचार करून गडकरी पुन्हा भाषणासाठी मंचावर उपस्थित झाले. त्यांचा हा उत्साह बघून उपस्थितांनी त्यांचे टाळ्या-शिट्ट्यांनी स्वागत केले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube