Jyoti Mete : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete)यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी कंबर कसली आहे. ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांनी आपल्या अप्पर सहनिबंधक पदाच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी स्व. विनायक मेटे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतले. […]
शनिवारचा दिवस राज्याच्या राजकारणात सगळ्यांचा आश्चर्यचकित करुन गेला. जे महादेव जानकर (Mahadev Jankar) शुक्रवारपर्यंत भाजपला शिव्या घालत होते, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत होते, शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठ्या मनाचा माणूस म्हणत, महाविकास आघाडीसोबत माढा मतदारसंघाबाबत चर्चा करत होते, तेच जानकर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून पुष्पगुच्छ स्वीकारतानाचा, फडणवीस […]
मुंबई : बारामतीमध्ये अजितदादांविरोधात दंड थोपटत मैदानात उतरलेल्या विजय शिवतारेंवर (Vijay Shivtare) शिस्तभंगाच्या कारवाईला वेग आला आहे. शिवतारेंना शिवसेनेकडून शिस्तभंगा कारवाईची नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले जात असून ही नोटीस आज (दि.26) पाठवणार आहे. या कारावाईमुळे शिवतारेंना पक्षाचे आदेश न पाळणे आणि अजितदादांविरोधात दंड थोपटणे चांगलेच महागात पडल्याचे दिसून येत आहे. शिवतारेंनी पक्षाचा आदेश न मानल्यास […]
मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. प्रवेशानंतर निरुपम यांना खासदार गजानन कीर्तीकर यांच्या जागी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. गतवेळी याच मतदारसंघात कीर्तीकर यांनी निरुपम यांचा […]
Sunil Tatkare : महायुतीकडून रायगड लोकसभा (Raigad Loksabha)मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हेच मैदानात उतरणार आहेत. आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या आयोजित पत्रकारपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar)यांनी ही घोषणा केली. त्याचवेळी बारामती लोकसभेची जागा देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच लढणार असल्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला आहे. “माहित नाही त्याचा हेतू काय होता […]
नवी दिल्ली : भाजपच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करणारी कंगना, विरोधकांना थेट शिंगावर घेणारी कंगना एवढेच नव्हे तर, ‘उद्धव ठाकरे आज मेरा घर टुटा हैं कल तेरा घमंड टुटेगा ये वक्त का पहियाँ हैं याद रखना’ असं थेट आव्हान देणारी कंगना रणावत (Kangana Ranaut) लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. कंगनाला भाजपनं हिमाचल प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे. […]