निवडणुकीच्या धामधुमीत ठाकरेंचा हुकमी एक्का मैदानाबाहेर; नाशकातील ‘फायरब्रँड’ नेता तडीपार
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) नाशिकमधील हुकमी एक्का मैदानाबाहेर गेला आहे. नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाची धाकधूक वाढली असून, यामुळे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, बडगुजर यांनी ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आहे. ही नोटीस नेमकी कोणत्या कारणासाठी बजावण्यात आली आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, ही नोटीस सलीम कुत्ता प्रकरणात सुरू असलेल्या चौकशी प्रकरणात अल्याचे सांगितले जात आहे. (Uddhav Thackeray Leader Sudhakar Badgujar Get Tadipar Notice )
बारामतीत मतदानाचा कमी टक्का, कुणाला देणार धक्का? पुतण्या अन् काकांचंं वाढलं टेन्शन
भुसेंचा इशारा अन् लगेच नोटीस
बडगुजर यांच्या संदर्भात काल (दि.8) पालकमंत्री दादा भुसे यांनी ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नजर ज्यावेळी यावर पडले. त्यावेळी हे संपूर्ण प्रकरण बाहेर येईल असे विधान केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच बडगुजर यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे यामागे काही राजकीय स्वरूप आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नोटीस घेण्यास बडगुजर यांचा नकार
ऐन निवडणुकांच्या धामधुमीत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे ठाकरे गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, दुसरीकडे पोलिसांनी बजावलेली ही नोटीस स्वीकारण्यास बडगुजर यांनी स्पष्ट नकार दिला असून, वकिलांशी चर्चा करून पुढील प्रकिया करू अशी भूमिका बडगुजर यांनी घेतली आहे.
बारामतीत मतदानाचा टक्का चंद्रकांतदादांमुळे कमी झाला; दोन दादांमधील वाद पुन्हा वाढणार?
कोण आहेत सुधाकर बडगुजर..?
सुधाकर बडगुजर हे नाशिक शिवसेना उबाठा गटाचे महानगर प्रमुख असून, 2007 पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा झाला. 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला. अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने 2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद सोपविले होते. नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर 2012 ते 2015 या काळात बडगुजर विरोधी पक्षनेतेपदी होते. मात्र, त्यानंतर 2014 मध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.