मोदी घटना बदलणार नाही म्हणतात, मग त्यांचे खासदार वेगळं का बोलतात? पवारांचा सवाल

मोदी घटना बदलणार नाही म्हणतात, मग त्यांचे खासदार वेगळं का बोलतात? पवारांचा सवाल

Sharad Pawar on PM Modi : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे. मोदी पुन्हा सत्तेवर आले तर संविधान बदलले जाईल आणि हुकुमशाही राजवट देशात येईल. त्यासाठी भाजपने 400 पारचा दिल्याचा आरोप इंडिया आघाडीने (India Alliance) वारंवार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच हा आरोप फेटाळून लावला आहे. आता शरद पवार (Sharad Pawar) यांनीही याच मुद्दावरून थेट पंतप्रधान मोदींना सवाल केला.

T20 World Cup : आम्ही फटाकेही घेतले आहेत पण…; 15 खेळांडूंमध्ये स्थान न मिळाल्याने रिंकूचे वडिल भावूक 

272 खासदारांच्या बळावर सरकार सत्तेवर येते. पण देशाची घटना दोन तृतीयांश जागांची गरज असल्याचे विधान भाजप खासदार लल्लू सिंह यांनी केले. हाच धागा पकडून पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणतात त्यांना संविधान बदलायचे नाही आणि खासदार असे वेगळं कसा बोलतात, असा सवाल पवारांनी केला. हातकणंगले मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ आज शरद पवारांची शिरोळ्यात सभा झाली. या सभेला संबोधित करतांना पवार बोलत होते.

T20 World Cup : आम्ही फटाकेही घेतले आहेत पण…; 15 खेळांडूंमध्ये स्थान न मिळाल्याने रिंकूचे वडिल भावूक 

पवार म्हणाले की, देशाची घटना बदलायची आहे, असे मोदींचेच खासदार सांगतात. उत्तर प्रदेशातील खासदार म्हणाले की, 400 पेक्षा जागा द्या, म्हणजे राज्यघटना बदलता येईल. मोदी म्हणतात त्यांना संविधान बदलायचे नाही आणि खासदार असं वेगळं कसं काय बोलतात, असा सवाल त्यांनी मोदींना केला. पुन्हा सत्तेत आल्यास भाजप संविधान बदलू शकते, असंही पवार म्हणाले. त्यामुळे आता सर्वांनी मविआसोबत उभं राहणं गरजेचं आहे, मविआचे खासदार जास्तीत जास्त संख्येने संसदेत गेले पाहिजे, असं आवाहनही पवारांनी केलं.

ते पुढे म्हणाले की, या देशात वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोदींच्या हातात देश गेला आहे. 2014 मध्ये सत्तेवर आल्यावर त्यांनी पेट्रोलचे दर कमी करणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी 71 रुपये असलेला दर आता 100 रुपयांच्या वर गेला आहे. सिलिंडरच्या किमती कमी करण्याबाबत ते बोलले होते. पण किमती कमी केल्या नाहीत. चांगले काम करूनही दिल्लीचे मुख्यमंत्री आज तुरुंगात आहेत, केजरीवाल यांनी दिल्लीचा चेहरा बदलाला. त्यांनी अटक करण्याची काय गरज होती? गेल्या दहा वर्षात आपण आपण हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहोत, असंही पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube