…म्हणूनच मोदींनी सभा टाळून रोड शोचा आग्रह केला; शरद पवार गटाची खोचक टीका

…म्हणूनच मोदींनी सभा टाळून रोड शोचा आग्रह केला; शरद पवार गटाची खोचक टीका

Sharad Pawar Party on PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोर लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मोदीजी आज मुंबईत रोड शो होत आहे. यावरूनच शरद पवार गटाने मोदींवर टीका केली.

प्रज्वल रेवण्णा, महागाई अन् कांद्यावरून अमोल कोल्हेंचा मोदींवर घणाघात 

मोदींच्या रोड शोसाठी मुंबईकरांना महायुतीने वेठीस धरले आहे. अनेक रस्ते आणि मेट्रो सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सायंकाळी साडेसहा वाजता मोदींच्या रोड शो सुरू झाला आहे. अशातच ताा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने एक ट्वीट केलं. त्यात राहुल शेवाळे, यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर या उमेदवारांची छायाचित्रे आणि त्यांच्यावरील अत्याचाराचा आणि घोटाळ्याचा उल्लेख आहे.

स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर गोळीबार, संशयित पोलिसाला घेतलं ताब्यात 

ट्वीट करत शरद पवार गटाने लिहिलं की, भ्रष्टाचारी व घोटाळेबाज उमेदवारांवर बोलण्याची वेळ येऊ नये यासाठीच सभा टाळून, भाषणबाजी टाळून मोदींनी फक्त रोड शोचाच आग्रह केल्याचा टोला राष्ट्रवादीने महायुतीला लगावला आहे.

तर विजय विजय वडेट्टीवार यांनीही एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, मुंबईमधील होर्डिंग दुर्घटना स्थळाजवळून पंतप्रधानांची रॅली भाजप काढत आहे. भ्रष्ट महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळं आणि धोरणांमुळे या दुर्घटनेत 18 निष्पाप लोकांना जीव गमावावा लागला. तरी देखील भाजपाच्या रॅली, रोड शो थांबत नाही. सत्तापिसासून भापजचा संवेदनशीलपणा संपला आहे. खरंतर ही घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती. मात्र रॅली काढून भाजपला आनंद मिळतांना दिसतोय, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

जिल्हा परिषद निवडणुकीतही एखादा नेता इतक्या सभा घेत नाही. तेवढ्या सभा मोदी या राज्यात घेत आहेत. याचा अर्थ असा आहे की, राहूल गांधी यांची मोदींनी भीती वाटतेय, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube