तुम्हाला सुपारी माझ्या नावाची मिळणं हा माझा विजय…; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना चिमटा
Sushma Andhare on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल ठाण्यात श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा आणि उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) जोरदार समाचार घेतला. राज ठाकरेंच्या टीकेला आता सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) जोरदार प्रत्युत्तर दिलं.
Weather Forecast : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात गारपिटीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. शिंदे-फडणवीस-अजित पवार यांनी दिलेल्या सुपारीमध्ये पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणं हा माझा विजय आहे, असा चिमटा अंधारेंनी काढला. सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटीसा यांची आठवण करून देत सोमवारी संध्याकाळी मी तुम्हाला उत्तर देईल, असंही म्हटलं.
सुषमा अंधारेंची पोस्ट-
मिस्टर राज,
तुमच्यात अन् माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. तुम्ही मात्र, कायम प्रोएस्टॅब्लिश भूमिका घेत आलात. शिंदे-फडणवीस-अजित पवार या सगळ्यांनी दिलेल्या सुपारीमध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणं हा माझा विजय आहे.
माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य नक्की आहे. बाळासाहेब म्हणतात, माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी. एकदा सुटली की शोधत बसत नाही, इथं पडली का तिथं पडली?
27 वर्षापूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही, तो दाखवून फार मोठे तीर मारले असं जर वाटत असेल तर रमेश किनी खून हत्याकंड, कोहिनूर मिल्स, ईडीच्या नोटीसा, देवेंद्र फडणवीस यांनी मनसे ऊनसे म्हणत केलेली अवहेलना, अजित पवारांची तुम्हाला गवत उपटण्यापर्यंतची केलेली सुसंस्कृत भाषा हे सगळं दाखवायला मला कितीसा वेळ लागेल? …पण असो माझ्या माऱ्यापुढे सत्ताधारी किती हतबल आहेत ना? सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे, याची पोचपावती आज तुम्ही दिली. माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायम गारूड करून राहायला हवं… धन्यवाद ..!
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरेंनी कालच्या सभेत सुषमा अंधारे यांच्या भाषणाचा जुना व्हिडीओ दाखवला. यामध्ये त्यांनी ८० वर्षांच्या बाळासाहेबांच्या हातामधील तलवार लटलटत असल्याची टीका केली होती. त्यावरून राज ठाकरेंनी बाळासाहेबांबद्दल अशी विधाने करणाऱ्या बाई शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून उद्धव ठाकरे नियुक्त करतात आणि वर आपले वडिलांवर प्रेम असल्याचा दावा करतात, हे पटणारे नाही, अशी टीका केली होती.