पाच गद्दारांना निवडणुकीपूर्वीच धडा मिळाला, उर्वरित गद्दारांना जनता धडा शिकवेल; अंधारेंची टीका

  • Written By: Last Updated:
पाच गद्दारांना निवडणुकीपूर्वीच धडा मिळाला, उर्वरित गद्दारांना जनता धडा शिकवेल; अंधारेंची टीका

Sushma Andhare on Shivsena : शिंदे गटाने काल हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha) मतदारसंघातून हेमंत पाटील (Hemant Patil) यांची उमदेवारी रद्द केली. त्याजागी बाबुराव कदम कोहलीकरांना उमेदवारी दिली. तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघातही भावना गवळींचा पत्ता कट करून राजश्री पाटलांना (Rajshree Patil) उमेदवारी दिली. त्यावरून ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार टीका केली. आता सुषमा अंधारेंनीही (Sushma Andhare) शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र डागलं. पाच गद्दारांना निवडणुकीपूर्वीच धडा मिळाला, उर्वरित गद्दारांना मतदार धडा शिकवील, अशी टीका अंधारेंनी केली.

Lok Sabha Election: अकोल्यात भाजपला बंडखोरीचे ग्रहण ! अनुप धोत्रेंविरुद्ध गव्हाणकरही मैदानात उतरले 

बुलढाणा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित सभेत सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जालंदर बुधवत, राष्ट्रवादीचे रोहित पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सभेला संबोधित करतांना अंधारे म्हणाल्या की, शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठबामुळं मोठं होऊन ज्यांनी गद्दारी केली. त्यापैकी पाच गद्दारांना निवडणुकीपूर्वीच म्हणजे उमेदवारी न मिळाल्यानं धडा मिळाला आहे. उर्वरित गद्दारांना जनता अर्थात मतदार धडा शिकवणार असल्याची टीका अंधारेंनी केली.

अलिबागच्या नामांतराची मागणी नार्वेकरांच्या अंगलट; भूमिपुत्रांचा कडाडून विरोध 

पुढं बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, गद्दारांना आतापासूनच केलेल्या कामाची फळे मिळत आहेत. यवतमाळ, नाशिक आणि इतर ठिकाणच्या पाच विद्यमान खासदार अगोदरच बाद झाले. आता बुलढाणासह बाकीच्यांना जनता जनार्दन धडा शिकणार हे उघड आहे. मूळ, निष्ठावान लोकांच्या शिवसेनेचाच विजय होईल. याचे कारण ‘बाप तर बाप होता है, ओरिजनल तो ओरिजनल होता है, असा टोला अंधारेंनी लगावला.

भाजपवाले टेंभी नाक्याकडे वाटाघाटीसाठी आले नाही तर त्यांना ते फक्त मुजरा करण्यासाठी भाजपला सोबत हवेत, असंही अंधारे म्हणाल्या.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?
गेल्या दहा वर्षात देशाला देशोधडीला लावणारे केंद्रातील सरकार आपलं नाही,. शेतकरी, तरुण, मजूर याची दैना करणारं हे जुलमी सरकार उलथवून टाका आणि आपलं सरकार आणा, या सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी काही केलं नाही सरकार आपलं नाहीच, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज