अलिबागच्या नामांतराची मागणी नार्वेकरांच्या अंगलट; भूमिपुत्रांचा कडाडून विरोध

अलिबागच्या नामांतराची मागणी नार्वेकरांच्या अंगलट; भूमिपुत्रांचा कडाडून विरोध

Rahul Narvekar News : अलिबागच्या नामांतराची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या चांगलीच अंगलट आल्याचं दिसून येत आहे. नार्वेकरांनी केलेल्या मागणीला भूमिपुत्रांकडून कडाडून विरोध केला जात आहे. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अलिबागच्या नामांतराची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली. नार्वेकरांनी मागणी केल्यानंतर आता अलिबागकर चांगलेच भडकले आहेत. नार्वेकरांच्या भूमिकेला विरोध करीत त्यांच्या मागणीचा निषेध अलिबागकरांकडून करण्यात येत आहे. नार्वेकरांना या मागणीनंतर चांगलच ट्रोल केलं जात असल्याचं दिसून येत आहे.

नारायण राणेंकडून प्रचाराला सुरूवात, रत्नागिरी-सिधुदुर्गवर आमचाच हक्क; उदय सामंतांनी ठणकावलं

राहुल नार्वेकरांची मागणी काय?
अलिबागचे नामांतर करण्यात यावे अशी मागणी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या निवेदनात म्हटलं की, अलिबागचं नाव मायनाक नगरी करण्यात यावे. तसेच मायनाक भंडारी यांचं अलिबाग शहरात स्मारकही बांधण्यात यावे, या मागणीचं पत्र राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ सिनेमाचं तगडं बजेट; अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांच्या फीचा आकडा थक्क करणारा

कान्होजीराजे आंग्रेंचा विचार करा :
सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी अलिबागचं नामांतर करायचं असेल तर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावाचा विचार करण्यात यावा, अशी मागणी केलीयं. तसेच अलिबागचे नाव बदलाची गरज नसल्याचं ते म्हणाले आहेत.

Chitra Wagh यांची कॉंग्रेसवर सडकून टीका; हेमा मालिनी अन् कंगनाबाबतच्या वक्तव्यावरून आक्रमक

ही मागणी चुकीचीच विरोध झालाच पाहिजे…

अलिबागच्या नामांतराची मागणी चुकीचीच आहे, विरोध झालाच पाहिजे, ही मागणी अलिबागकरांनी केलेली नाही, नामांतराची गरजच नसल्याचं माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईकांनी स्पष्ट केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज