Uddhav Thackeray : सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करा; ठाकरेंनी कॉंग्रेसला ठणकावलं

  • Written By: Last Updated:
Uddhav Thackeray : सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करा; ठाकरेंनी कॉंग्रेसला ठणकावलं

Uddhav Thackeray PC : भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी अखेर ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. पाटील यांच्यासह त्यांचे शेकडो समर्थकही ठाकरे गटात सामील झाले. पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलतांना कॉंग्रेसला कडक शब्दात सुनावलं. शिवसैनिकांनी काँग्रेसचा (Congress) प्रचार सुरू केला, तसा सागलीसह जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत, तिथं काँग्रेसने प्रचाराला सुरुवात करावी, असे ठाकरेंनी सांगितलं.

‘भूल भुलैया 3’ मध्ये माधुरीची एंट्री; विद्या बालनसोबत साकारणार भुताची भूमिका, कियाराचा पत्ता कट?

उन्मेष पाटलांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, तुम्हा सर्वांचे शिवसेनेत स्वागत आहे. तुमच्या आणि माझ्या भावना सारख्याच आहेत. तुम्ही भाजपचा विस्तार करण्याचे काम केले. शिवसैनिकांनीही काम केले. मात्र भाजपने वापरा आणि फेकण्याची वृत्ती स्वीकारली, अशा शब्दात ठाकरेंनी सुनावलं.

‘उत्तर देऊ शकत होतो पण..,’; आंबेडकरांच्या आरोपांवर ठाकरे पहिल्यांदाच बोलले 

सांगलीच्या जागेबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला स्पष्ट शब्दात अल्टिमेटम दिला. सांगलीच्या जागेचा फेरविचार होणार नाही. सांगलीचा उमेदवार आम्ही जाहीर केला. याशिवाय चार उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. आता लवकरच प्रचाराला सुरूवात करणार आहोत. इतर ठिकाणी आमचे उमेदवार नाहीत. पण, काँग्रेसचे उमेदवार आहेत. पूर्व विदर्भात आमची एकही जागा नाही. त्या भागातील शिवसैनिक नाराज आहेत. पण, मी शिवसैनिकांना समजावून सांगितले. त्यानुसार, शिवसैनिकांनी काँग्रेसचा प्रचार सुरू केला आहे. तसा सांगलीसह जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत, तिथं काँग्रेसने प्रचाराला सुरुवात करावी, असे ठाकरेंनी कडक शब्दात सांगितलं.

आज एकत्र नसलो तरी भविष्यात एकत्र येऊ शकतो
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांवर केलेल्या टीकेविषयी विचारले असता ठाकरे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी अशी भाषा करू नये. आम्हाला अजूनही त्यांच्याकडून आशा आहेत. संविधानाच्या रक्षणासाठी आपण एकत्र येऊ शकतो. एकत्रितपणे लढा देऊ शकतो. आज जरी आपण एकत्र नसलो तरी भविष्यात आपण एकत्र येऊ शकतो. कृपया आमच्यावर टीका करू नका. तुम्ही आमच्यावर टीका केली तरी मी प्रत्युत्तर देणार नाही. प्रकाश आंबडेकरांनी राऊतांवर केलेल्या टीकेला आम्ही उत्तर दिलं नाही. आम्ही पलटवार करू शकत नाही, असं नाही. मात्र, शिवसैनिकांनाही सांगितले की, प्रकाश आंबेडकरांवर टीका करू नका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज