औरंगजेबाची स्तुती करणं आझमींना भोवलं; निलंबनाबरोबरच फडणवीसांनी दिला तुरूंगात टाकण्याचा इशारा

Devendra Fadnavis on Abu Azmi : समाजवादी पार्टीचा आमदार अबू आझमी याला मुघल शासक औरंगजेबाचं गुणगान करणं चांगलंच महागात पडलं आहे. त्यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आजही विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी अबू आझमींवर घणाघाती टीका केली. सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. यानंतर अधिवेशन संपेपर्यंत आमदार अबू आझमी यांना निलंबित करण्यात आले. यानंतर विधानपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अबू आझमीला शंभर टक्के तुरुंगात टाकू असा इशारा दिला.
धनंजय मुंडेंनंतर आता मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्री फडणवीस अन् अजित पवारांकडे, केली मोठी मागणी
प्रशांत कोरटकर अवमानकारक बोलतो. त्याचा मोबाइल जप्त केला जातो. पण त्याला अटक होत नाही. अबू आझमीवर सु्द्धा कारवाई झालीच पाहीजे. त्यालाही जेलमध्ये टाकले पाहिजे. अबू आझमीला उचलून जेलमध्ये का टाकलं नाही? गृहमंत्री समोर बसलेले आहेत. आझमीला उचलून जेलमध्ये टाकलच पाहीजे अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केली. यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, जेलमध्ये टाकू शंभर टक्के टाकू. प्रशांत कोरटकरने कोल्हापूरच्या न्यायालयातून अटकेपासून संरक्षण मिळवले आहे. प्रशांत कोरटकर वगैरेंसारखी चिल्लर लोकं आहेत. पण जितेंद्र आव्हाड बोलतात त्यावर कधीच निषेध केला नाही तुम्ही. असे ठराविक करू नका.
आता त्याच्याही पुढे जाऊन सांगतो पंडीत जवाहरलाल नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया (Discovery of India) या त्यांच्या पुस्तकात जे लिहीलं त्याचा तुम्ही निषेध करणार आहात का.. तुमच्यात हिंमत आहे का.. त्यामुळे पंडीत नेहरू यांचा देखील धिक्कार झाला पाहीजे अशी मागणी फडणवीस यांनी सभागृहात केली. यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर सभापती राम शिंदे यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.