महिलांशी गैरवर्तन केल्यास एसपींना टायरखाली घ्यायला सांगेन; अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी

महिलांशी गैरवर्तन केल्यास एसपींना टायरखाली घ्यायला सांगेन; अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी

Ajit Pawar warn activist on Mistreatment with women : आज जालन्यामध्ये परतूरचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी त्यांनी कार्यकर्त्यांना महिलांशी गैरवर्तन करू नका म्हणत थेट इशारा दिला आहे.

मुंडे-धस यांची गुप्तभेट: बातमी फोडून भाजपने धसांचा गेम केलाय का ?

यावर बोलताना पवार म्हणाले की, महिलांशी वेडेवाकडेपणा करू नका. अन्यथा मकोका लावीन. तसेच एसपीला सांगीन की, अशा प्रकारे महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना टायरखाली घ्या. असं म्हणत त्यांनी थेट कार्यकर्त्यांना तंबीच दिली आहे. अजित पवार नेहमीच त्यांच्या थेट आणि परखड भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यात ते राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना देखील सोडत नसल्याचं अनेकदा पाहायला मिळत.

माणिकराव कोकाटे सडेतोड बोलणारी व्यक्ती पण समर्थन करणार नाही, मंत्री विखेंनी भूमिका

त्याचबरोबर यावेळी त्यांनी पिकविमा योजनेचा गैरवापर करणाऱ्या लोकांना फटकारलं आहे. त्यावर ते म्हणाले की, काहींनी देवस्थानाची जमीन दाखवून पीकविमा भरला आहे. अरे हे पाप कुठे फेडाल ? असा सवाल अजित पवारांनी केला आहे. दुसऱ्यांनीच या योजनेचा फायदा घेणं चुकीचं असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत.

राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या या योजनेत लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. परंतु, निवडणूक काळात 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. तर महिलांच्या खात्यात या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? याबाबत स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली ते जालन्यामध्ये बोलत होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube