लाडकी बहिण योजनेमुळे महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर; अजित यशवंतराव यांच्या ट्वीटमुळे खळबळ

लाडकी बहिण योजनेमुळे महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर; अजित यशवंतराव यांच्या ट्वीटमुळे खळबळ

Ajit Yashwantrao Tweet on Uday Samant : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादीच्या महायुती सरकारची योजना आहे. मात्र, रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ करताना व अंमलबजावणी करताना आंम्हा सत्तेतील सहयोगी पक्षांना विश्वासात न घेता आपलीच मनमानी करत आहेत. या योजनेच्या नावाखाली पालकमंत्र्यांकडून (Ajit Yashwantrao ) लाडक्या भावाचा छुपा प्रचार सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते अजित यशवंतराव यांनी केला आहे.

एवढा आटापिटा का? अबब! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दोन आठवड्यात 44 लाख महिलांचे ऑनलाईन अर्ज

गुरूवारी लांजा व राजापूर तालुक्यात या योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात महायुतीतील सहयोगी पक्षांना सामंत यांनी डावलल्याचा आरोप करत राज्यात महायुतीचे सरकार आहे आणि या महायुतीमुळे ते राज्यात मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री आहेत याचा त्यांना विसर पडल्याचा टोलाही यशवंतराव यांनी यावेळी लगावला आहे. तसचं, इतक्या घाईगडबडीत सहयोगी पक्षांना विश्वासात न घेता, कार्यक्रमांना न बोलावता सामंत हे कार्यक्रम करत आहेत हे नक्की कोणासाठी, एवढा आटापिटा का आणि कशासाठी असा थेट प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

मनमानी चालणार नाही

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून कौटुंबिकीकरण चालू आहे याची प्रचिती राजापूर व लांजा येथे पार पडलेल्या कार्यक्रमातून येते. महायुती सरकारने सुरु केलेल्या योजनेसाठी घटकपक्षांना डावलत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेखाली आपला लाडका भाऊ जबरदस्तीने जनतेवर लादण्याचा प्रकार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसंच, ही मनमानी आम्ही कदापीही खपवून घेणार नाही असं स्पष्ट करताना सामंत यांनी त्यांच्या सोयीचं आणि स्वार्थाचं राजकारण बंद करावं अन्यथा आंम्हाला आमच्या पक्षनेतृत्वाशी बोलून यावर विचार करावा लागेल असा ईशाराही त्यांनी दिला आहे.

वैयक्तीक योजना आहेत का? IAS पूजा खेडकर की झोलकर? अपंग प्रमाणपत्रासाठी दिलेल्या पत्त्यावर आईची अनधिकृत कंपनी

राज्यातील महायुती सरकारचा हा कार्यक्रम आहे, त्याची अंमलबजावणी करताना जिल्ह्यातील महायुतीच्या सहयोगी पक्षांना सोबत घेऊन करणं आवश्यक आहे. जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून ही सामंत यांची जबाबदारी आहे. मात्र, तसं होताना दिसत नाही असं यशवंतराव यांनी नमुद केलं आहे. जाणीवपुर्वक सामंत हे महायुतीतील सहयोगी पक्षांना डावलून आपली मनमानी करत शासकिय कार्यक्रम करत आहेत, या योजनेसह सर्वच योजना या राज्यातील महायुती सरकारकडून राबवल्या जात आहेत. त्या काय सामंत यांच्या वैयक्तीक योजना आहेत काय? असा सवालही यशवंतराव यांनी उपस्थित केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube