अंजली कृष्णा प्रकरण, अंजली दमानियांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

Anjali Damania On Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांच्यात झालेला फोनवरील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
याबाबात अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या की, मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह (Devendra Fadnavis) मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि महाराष्ट्र पोलिसांकडे देखील पाठवली आहे. कायदा हा सर्वांसाठी समान असतो त्यामुळे कोणीही दादागिरी करु शकत नाही. राजकारणी तर अजिबात दादागिरी करु शकत नाही. अवैध धंदे सुरु आहे. लूट सुरु आहे. पोलिस अधिकाऱ्यांवर राजकीय (Deputy Superintendent of Police Anjali Krishna) दबाव आहे. हे आता थांबवण्याची गरज आहे. त्यामुळे मी आज लेखी तक्रार पाठवली आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई होणार नाही हे देखील मला माहिती आहे. असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या.
तर दुसरीकडे या प्रकरणात काही दिवसांपूर्वी एक्स वर एक व्हिडिओ पोस्ट करत अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. या व्हिडिओमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या होत्या की, अजित पवारांना फ़ोन करणारे हेच ते तालुका प्रमुख बाबाराजे जगताप आहेत का? ह्यांच्या हातात काय आहे ? अश्या लोकांसाठी अजित पवारानी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकावले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
अजित पवारांना फ़ोन करणारे हेच ते तालुका प्रमुख बाबाराजे जगताप आहेत का?
ह्यांच्या हातात काय आहे ?
अश्या लोकांसाठी अजित पवारानी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकावले? pic.twitter.com/A9s5uKPpUg
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) September 6, 2025
नेमकं प्रकरण काय?
सोलापूरच्या महिला IPS अधिकारी पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरुन धमकी दिली होती. माढा तालुक्याच्या कुर्डू गावात अवैध उत्खननची तक्रारीनंतर डीएसपी अंजली कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या होत्या. यावेळी अवैध मुरुमचे उत्खनन करणारे आणि अधिकारी यांच्यात मोठा वाद झाला. अवैधचे उत्खनन करणारे लाठ्या काठ्या घेऊन आले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी केली. यानंतर अजित पवार यांनी पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना कारवाई न करण्याचे आदेश दिले होते.
भारतात iPhone 17 ची तुफान क्रेझ; लॉन्चिंगपूर्वीच फीचर्स अन् किंमत लीक, जाणून घ्या किंमत