मराठा आरक्षण सर्वपक्षीय बैठकीवरून विधानसभेत गदारोळ; आमदार साटमांसह शेलारही आक्रमक

मराठा आरक्षण सर्वपक्षीय बैठकीवरून विधानसभेत गदारोळ; आमदार साटमांसह शेलारही आक्रमक

Assembly session : विधानसभेत आज मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजला. काल महायुती सरकारने मराठा आणि ओबीस आरक्षणासंदर्भात एक बैठक आयोजीत केली होती. त्या बैठकीला विरोधकांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु, विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. (Maratha Reservation) त्यावरून मोठा गदारोळ आज विधानसभेत पाहायला मिळाला. (Assembly session) भाजप आमदार अमित साटम यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करत विरोधकांना मराठा समाजाचं काही देणघेण नाही. त्यांना विधानसभेच्या निवडणुकांची काळजी पडली असा आरोप करत जोरदार गदारोळ केला.

विधानसभेसाठी शरद पवारांचा पहिला उमेदवार जाहीर, म्हणाले, सुमनताईनंतर आता रोहितला साथ द्या

यावेळी सत्ताधारी बाकावरून सर्वचजण उठून गदारोळ करायला लागले. दरम्यान, आमदार आशिष शेलार यांनीही हा प्रश्न उपस्थित करत विरोधकांना कुणाचा फोन, एसएम आला आणि त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला असा प्रश्न उपस्थित करत जोरदार टीका केली. यावेळी सभापतींनी सदस्य शांत होत नसल्याने सभागृहाच कामकाज अगोदर पाच मिनीटांसाठी आणि पाऊन तासासाठी तहकूब करण्यात आलं.

मराठा समाजाला ओबीसीअंतर्गत कुणबी दाखले मिळण्यासाठी ‘सगेसोयरे’ संदर्भात अंतिम अधिसूचना जारी करण्याची मागणी असली तरी त्यासंदर्भात कायदेशीर मत घेतल्यावर आणि विरोधी पक्षांनी भूमिका मांडल्यावर राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. या अधिसूचनेस ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे.

विरोधकांनी आपले रंग दाखवले; मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलण्यास वेळ नाही -फडणवीस

या सर्व घटनांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा-ओबीसी आरक्षण वादाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बेठक आयोजित केली होती. मात्र, त्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे वातावरण तापलं आहे. त्याचे मोठे पडसाद आज विधानसभेत पाहायला मिळाले. महाराष्ट्र पेटता राहिला पाहिजे आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजता आली पाहिजे, अशी विरोधकांची भूमिका असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज