“मला हलक्यात घेऊ नका, याच दाढीवाल्याने आघाडी उद्धवस्त केली”, CM शिंदेंनी थेट ललकारलंच

“मला हलक्यात घेऊ नका, याच दाढीवाल्याने आघाडी उद्धवस्त केली”, CM शिंदेंनी थेट ललकारलंच

Eknath Shinde Challenges Uddhav Thackeray : काही लोकांना हिंदू शब्दाचीही लाज वाटते. हिंदूहृदयसम्राट म्हणायला त्यांची जीभ कचरते. पण आपल्याला या शब्दाचा अभिमान आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून आपण शिवसेना मुक्त केली. आता माझ्या दाढीवरून विरोधकांकडून टीका केली जाते. पण याच दाढीवाल्याने महाविकास आघाडी उद्धवस्त केली. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका. मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला ललकारलं.

विजयादशमीनिमित्त मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. शिंदे पुढे म्हणाले, मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. आनंद दिघेंचा चेला आहे. मला हलक्यात घेऊ नका. मी कधीच मैदान सोडत नाही. आज महाराष्ट्रात एकनाथ शिंदे जिथं जातो तिथं स्वागत होतं. लोक आशीर्वाद देतात हेच आपण कमावलंय दोन वर्षात आपलं लाडकं सरकार झालं आहे.

मंत्र्यांना घरी आणि जेलमध्ये बसविणार; दसरा मेळाव्यातील पहिल्याच भाषणात आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

.. म्हणून मविआचे काळे धंदे बंद झाले

आमच्या सरकारनं गिरणी कामगारांना घरं दिली. त्यांच्या कष्टामुळेच आज मुंबई उभी राहिली आहे. आता आम्हाला मंबई झोपडपट्टी मुक्त करायची आहे. रखडलेले प्रकल्प आमचं सरकार मार्गी लावणार आहे. मुंबईतून बाहेर गेलेले मुंबईकर नागरिकांना पुन्हा शहरात आणणार आहोत असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. अनेक कामांत मी स्वतः निर्णय घेतो त्यामुळे महाविकास आघाडीचे काळे धंदे बंद झाले.

त्यामुळे आता रोजच आमच्यावर टीका होत आहे. पण आम्ही काही फेसबूक लाइव्ह नाही. फेस टू फेस काम करणारे आहोत. आम्ही जर उठाव केला नसता तर मोरू उठला नसता आणि आंघोळ करून झोपला असता. आता हाच मोरू दिल्लीत चकरा मारत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांची आता दिल्लीवारी सुरू झाली आहे, अशी खोचक टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

 

आझाद सेनेचा हा आझाद मेळावा

गर्व से कहो हम हिंदू है, अशी घोषणा बाळासाहेबांनी या देशाला दिली. पण याच शब्दाची काही जणांना लाज वाटू लागली. हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना आता लाज वाटत आहे. आपण अशा लोकांपासून शिवसेना मुक्त केली अशा आझाद सेनेचा हा आझाद मेळावा आहे.

 

MUST READ : 

एकतर तू तरी राहशील नाहीतर मी.. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थेट ललकारलंच

Dasara Melava LIVE : घासून नाही ठासून 2 वर्षे पूर्ण केली, मला हलक्यात घेऊ नका : शिंदे

अभिनेता सयाजी शिंदे नंतर सुरज चव्हाणही अजितदादांच्या पक्षात? ‘त्या’ भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण

follow us
  • fb
  • instagram
  • youtube