उच्च न्यायालय सुट्टीवर गेलं काय? राज ठाकरेंविरुद्धच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारलं

CJI On Petition Against Raj Thackeray : राज्यात मराठी व हिंदी भाषेवरुन वाद सुरू आहे. (Thackeray) यामध्ये मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. अनेकदा, मनसे पदाधिकारी हिंदी भाषिकांना भाषेच्याबद्दल आरेरावी केल्याने मारहाण करत असल्याचंही चित्र मुंबईत दिसलं आहे. यानंतर ठाकरे बंधू एकत्र येत मेळावा झाला. त्याबद्दल आता एक बातमी समोर आली आहे.
या मेळाव्यातील भाषणांवर आक्षेप घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध याचिका (PIL) दाखल करण्यात आली. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संपन्न झाली असून न्यायालयाने याचिकाकर्त्यास फटाकरलं आहे. ‘उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का?, असा प्रश्न सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यास विचारला आहे. या याचिकेवर आज सरन्यायाधीश भूषण गवई आणि के. विनोद यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यामध्ये, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत.
Video : राज ठाकरेंना अर्बन नक्षलवादी म्हणून अटक करणार?; ठाकरेंच्या चॅलेंजवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यास उच्च न्यायालयात जाण्याचं स्वातंत्र्य देत सर्वोच्च न्यायालयाने याचिका मागं घेण्याचं सूचवलं आहे. त्यानंतर, याचिकाकर्त्यांनी याचिका सर्वोच्च न्यायालयातून काढून घेतल्याची माहिती आहे. राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून महाराष्ट्रातील हिंदी भाषिक नागरिकांविरुद्ध हिंसाचार भडकवल्याचा आणि भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप करत मनसे प्रमुखांविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी करणारी ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
मुंबई उच्च न्यायालयाचे वकील घनश्याम उपाध्याय यांनी शुक्रवारी18 जुलै 2025 रोजी ही याचिका दाखल केली होती. त्यावर, सर्वोच्च न्यायालयाच आज सुनावणी झाली. त्यामध्ये, याचिकाकर्त्यास उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबईत आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या बैठकीत प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला होता, त्यामुळे फक्त पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्तेच उपस्थित होते. मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे.