Nitin Gadkar | Balasaheb Thorat : जेव्हा काँग्रेस नेत्याला भाजप नेत्याचं कौतुक करायला शब्द कमी पडतात…

Nitin Gadkar | Balasaheb Thorat : जेव्हा काँग्रेस नेत्याला भाजप नेत्याचं कौतुक करायला शब्द कमी पडतात…

Balasaheb Thorat On Nitin Gadakari :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. नितीन गडकरी हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी कायम सांगितले आहे की पक्षबदल हा योग्य नसतो, असे म्हणत थोरातांनी गडकरींचे कौतुक केले आहे. याआधी एका आपल्या भाषणात बोलताना गडकरी यांनी मी विहीरत उडी मारेन पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही, असे म्हटले होते. यावर थोरातांनी बोलताना गडकरींचे कौतुक केले आहे.

नितीन गडकरी हे वैशिष्ट्यपूर्ण नेतृत्व आहे. त्यांना काही गोष्टी स्पष्टपणे बोलण्याची सवय आहे. त्यांना काँग्रेसमध्ये पक्षाची ऑफर असेल. पण त्यांनी पक्ष बदलण्याला कायम विरोध केला आहे. ज्याप्रमाणे जहाज बुडायला लागल्यावर उंदर उड्या मारतात तसे लोक पक्ष बदलतात, यावर त्यांनी कायमच टीका केली आहे. जिथे असाल तिथं आपला विचार, आपलं तत्वज्ञान घेऊन चाललं पाहिजे, असे कायम ते सांगतात, असे म्हणत थोरातांनी गडकरींचे कौतुक केले आहे.

महाविकास आघाडीचं जागावाटप कसं होणार? अजितदादांनी दिला महत्वाचा अपडेट

तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी आणखी एक आठवण सांगितली. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये होतो तेव्हा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कायम सन्मान दिल्याचे गडकरींनी सांगितले होते. राजकारण कसं असलं पाहिजे हे सांगताना त्यांनी या गोष्टी सांगितल्या असून त्या मार्गदर्शक आहे, असे थोरात म्हणाले.

मुंबईत बेसिक गोष्टी मिळेनात अन् नाईट लाईफ… श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

काय म्हणाले होते गडकरी

काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांनी मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. तुम्ही भाजपमधील चांगले कार्यकर्ते आणि नेते आहात. तुम्ही काँग्रेसमध्ये आल्यास तुमचं भविष्य उज्ज्वल असेल, असं जिचकार मला म्हणाले होते. त्यावर, मी लगेच त्यांना उत्तर दिलं. काँग्रेसमध्ये सामील होण्या ऐवजी मी विहिरीत उडी घेईन असं त्यांना सांगितलं होतं. माझा भाजपच्या विचारधारेवर पूर्ण विश्वास असल्याचंही मी जिचकार यांना सांगितलं होतं, असं नितीन गडकरी म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube