“…म्हणुनच राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना”, जयंती सोहळ्यात फडणवीसांचे गौरवोद्गार
पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
Fadnvis on Raje Umaji Naik : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील रामोशी, बेडर व बेरड समाजाचे योगदान लक्षात घेऊन या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
अंजली कृष्णा प्रकरण, अंजली दमानियांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; अजित पवारांच्या अडचणी वाढणार?
“आमचा रामोशी समाज, बेरड समाज, यांचा इतिहास अतिशय स्वर्णीम प्रकारचा इतिहास आहे. संस्कृतीचं संरक्षण करणारा, देव-देश-धर्माकरता लढणारा, निसर्गाचं संवर्धन करणारा, अशाप्रकारे दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारा समाज रामोशी समाज आहे. खऱ्या अर्थाने रामोशी समाजाचं नातं तर प्रभू श्री रामांशी असल्याचं पहायला मिळतं”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी (Fadnavis) समाजाच्या (Raje Umaji Naik) योगदानाबद्दल सांगितलं.
बहिरजी नाईक स्वराज्याचा तिसरा डोळा
रामोशी, बेडर व बेरड समाजाच्या (Raje Umaji Naik) योगदानाबद्दल बोलताना फडणवीस (Fadnavis) म्हणाले की, “मोठ्या प्रमाणात दख्खनच्या इतिहासात आमच्या रामोशी समाजाच्या वेगवेगळ्या राजांनी केलेलं कार्य हे अतुलनीय कार्य आहे. जेव्हा छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्रित करून मावळ्यांची फौज उभारली आणि स्वराज्याचा झेंडा या मराठी मातीत उभारला तेव्हा बलिदान देणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये बहिरजी नाईक होते. शत्रुच्या छावणीत अचूकपणे शिरणारे बहिरजी नाईक यांच्यावर महाराजांचा सर्वाधिक विश्वास होता. बहिरजी नाईक यांच्या गुप्तहेर पद्धतीमुळे स्वराज्याला सगळी माहिती आधीच मिळायची. म्हणुनच बहिरजी नाईक यांना तिसरा डोळा म्हणून संबोधलं गेलं. असे म्हणत फडणवीसांनी (Fadnavis) स्वराज्यातील रामोशी समाजाच्या (Raje Umaji Naik) भूमिकेचं कौतूक केलं.
मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र मिळणार नाही; कुणबी नोंदींवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठ वक्तव्य
इतिहासातील दाखला
पुढे ब्रिटिशांच्या काळातही स्वातंत्र्यलढ्यातील रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या (Raje Umaji Naik) चळवळींबद्दल सांगताना फडणवीस (Fadnavis) म्हणाले, “मराठेशाही कमजोर झाल्यानंतर ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीला खऱ्या अर्थाने कोणी विरोध केला असेल तर ते राजे उमाजी नाईक (Raje Umaji Naik) होते. आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांनी निर्णय घेतला की परकीयांचं राज्य या देशात चालू देणार नाही. म्हणून रॉबर्ट नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने 1820 साली एक पत्र इंग्रज सरकारला लिहित उमाजी नाईक (Raje Umaji Naik) आणि रामोशी समाजाची कल्पना दिली. त्यात लिहिलं की, ‘हा समाज राजकीय बदलाची वाट पाहत आहे. कुणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी महाराजांसारखं राज्य तर स्थापन करणार नाही’. अशाप्रकारचं पत्र इतिहासात उपलब्ध आहे”. असंही त्यांनी (Fadnavis) यावेळी सांगितलं.
राज्य सरकार समाजाच्या पाठीशी
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) म्हणाले की, “80 वर्षांच्या सामाजिक दबावामुळे, सांस्कृतिक दबावामुळे, शैक्षणिक वंचिततेमुळे समाज कुठेतरी मागे पडला. जंगलात, दऱ्या-खोऱ्यांमध्ये वावर करताना समाजाचं तेज कुठेतरी कमी पडलं. आज आवश्यकता आहे की समाजाला राजे उमाजी नाईकांचं तेज परत करण्याची. म्हणुनच आपल्या सरकारने रामोशी, बेरड. बेडर समाजाला त्यांच्या इतिहासाची, शौर्याची आठवण करून द्यायची. त्यांना देशाच्या आर्थिक प्रवाहात आणायचं. म्हणुनच राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ हे आपण सुरू केलंय. मला आता सांगताना आनंद वाटतो की, आताच्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय केला आता दोन लाख पर्यतच्या कर्जाला तारण लागणार नाही. आणि 15 लाखांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज रामोशी तरूणांना देण्यात येईल”. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी (Fadnavis) यावेळी दिली.
