Video : देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड येणारच; मात्र, धनंजय मुंडेही जर… काय म्हणाले आमदार धस?
Suresh Dhas Exclusive on Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण हे भयानक क्रूर आहे. त्याबद्दल कोणतीही सहानुभूती नाही. त्यामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई झालेली आहे. तसंच, हे लोक काही चाल खेळत नाहीत असं नाही. तेही जरा चाल खेळतात. परंतु, त्याने काही फरक पडणार नाही. सध्या तपास एसआयटीकडे असून यामध्ये कुणीही सुटणार नाही. यातील आरोपी असलेला विष्णू चाटे हा काही अटक झालेला नाही त्यानेही सरेंडरच केलं आहे. (Suresh Dhas) तो उघडच आहे की वाल्मिक कराडांचा हस्त आहे. त्यामुळे तेही 302 दोनमध्ये जाणारच असं ठाम मत भाजप आमदार सुरेश धस यांनी मांडलं आहे. ते लेट्सअप मराठी या वाहिनीवर लेट्सअप सभा या खास कार्यक्रमात बोलत होते. संपादक योगेश कुटे यांनी धस यांना अनेक विषयांवर बोलत केलं आहे.
भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम कुणी केला ? आ. धसांनी थेट फडणवीसांचचं नाव घेतलं
वाल्मिक कराड यांचे खूप मोठे प्रकरण आहेत. पुण्यातील एफसी रोड येथेही त्यांची प्रॉपर्टी आहे. तसंच, विष्णू कराडच्या बहिणीच्या नावावरही काही प्रॉपर्टी आहे असंही आमदार धस यावेळी म्हणाले आहेत. सध्या सर्व लोकांची भावना आहे ती म्हणजे वाल्मिक कराड 302 दोन मध्ये आणि मकोकामध्ये गेला पाहिजे. परंतु, इतर कुणालाही यामध्ये हे सांगण्याची आवश्यकता नाही ते कायद्यानेच होणार आहे असंही ते म्हणाले आहेत. तसंच, मी धनंजय मुंडे यांच्याबद्दल नाही तर अगोदर वाल्मिक कराड यांच्याविषयी बोलत होतो. ते आज ठामपणे सांगतो ते नक्की खुनाच्या गुन्ह्यात जाणार असंही ते म्हणाले आहेत.
यामध्ये मात्र, जर काही असेल तर ते म्हणजे धनंजय मु्ंडे यांच्या बंगल्यावर खंडणीबाबद बेठक पार पडली. त्यामध्ये किती पैसे घ्यायचे काय ही डील झाली. पुढे पैसे वेळेवर मिळत नाहीत म्हणून ही टोळी तिथ चाल करून गेलेली आहे. हे कुणाच्या आदेशावर गेले आहेत. हे वाल्मिक कराडच्या आदेशानेच तिथं गेले आहेत असं ठाम मत आमदार धस यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर हा जो काही व्हिडिओ आहे तो वाल्मिक कराडला दाखवला असेल आणि त्यांनीही तो पाहिला असेल, असं मारा, तस मारा असं सांगितलं असेल अशी शक्यताही धस यांनी व्यक्त केली आहे असंही ते म्हणाले आहेत.
देशमुख कुटुंबाकडून जो जवाब देण्यात आला आहे त्यामध्ये वाल्मिक कराड याच नाव घेतल आहे. त्यामुळे तो आता काही सुटणार नाही असंही ते म्हणाले आहेत. कारण आता फक्त संतोष देशमुख यांचा भाऊच नाही तर पूर्ण मस्साजोग आता समोर आलं आहे. कारण त्यांचा माणूस असा जर मारला असेल तर त्यांच्या काय भावना असतील असं म्हणत धस यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त करत संतोष खूप लाघवी चेहऱ्याचा होता. तो मुलगा कधी वाईट वागला नसेल. मग त्याला जर असं मारत असतील तर गाव अंगावर येणारच असंही धस यावेळी म्हणाले आहेत.