‘मी अध्यक्ष होणार नाही’; सुप्रिया सुळे यांचा दुसरा मार्ग देखील मोकळा
Jayant Patil On NCP Chief Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर नवीन अध्यक्ष कोण होणार याबाबत अनेक चर्चा केल्या जात आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. मी दिल्लीत काम करु शकत नाही. माझ्या दिल्लीत ओळखी नाहीत. मी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच शरद पवार हे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत, असे पाटील यांनी म्हटले आहे.
शरद पवार हे निवृत्ती घेण्यावर ठाम आहेत. पण पक्षातील अनेकांचे मत आहे की, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनीच अध्यक्ष रहावे अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. कार्यकर्त्यांची भावना मी त्यांना सांगितली आहे, असे पाटील म्हणाले आहेत. यावेळी त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी तुमचे नाव चर्चेत आहे, असे सांगण्यात आले यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे.
संजय राऊतांकडून काँग्रेसची दलाली; फडणवीसांचा हल्लाबोल
सरोज पाटील यांनी जरी माझे नाव घेतले असले तरी मी महाराष्ट्रात काम करतोय. दुसऱ्या राज्यात काम करण्याचा मला अनुभव नाही आहे, व माझ्या ओळखी देखील नाही आहेत. त्यापेक्षा दिल्लीत काम करणाऱ्या, लोकसभा व राज्यसभेत बसून काम करणाऱ्या व्यक्तीने अशा जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, असे ते म्हणाले आहेत. पवार साहेबांना तो अनुभव आहे. त्यामुळे पवार साहेब देशभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचे काम करु शकले असेही त्यांनी सांगितले आहे.
Sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार
मी सध्या प्रदेशाध्यक्ष आहे. मला व माझ्या सहकाऱ्यांना सर्वात जास्त काळजी 2024च्या विधानसभेची आहे. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की लोकसभा व विधानसभा होईपर्यंत पवारसाहेब जर अध्यक्ष राहिले तर पक्षातील सर्व घटकांना ते न्याय देऊ शकतील, असे ते म्हणाले आहेत.