‘बाळासाहेबांनी झेंडे नसलेल्या पक्षाच्या नेत्याला गादीवर बसवलं’; जाधवांची भाजपवर सडकून टीका
Bhaskar Jadhav On BJP : एकेकाळी झेंडे नसलेल्या पक्षाच्या नेत्यााल बाळासाहेबांनी दिल्लीच्या गादीवर बसवलं असल्याची सडकून टीका ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाची राज्यभरात जनसंवाद यात्रा सुरु आहे. चिपळूणमध्ये आज जनसंवाद यात्रेची सभा पार पडली. या सभेदरम्यान, बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपकडे झेंडे नसल्याचा जुना किस्सा भाषणात सांगितला आहे.
मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात, नातेवाईकांनाही उमेदवारी
भास्कर जाधव म्हणाले, भाजपसोबत चाळीस वर्ष सेनेने संसार केला. आठवा तो काळ जेव्हा शिवसेनेचा मी तालुकाध्यक्ष होतो, तेव्हा ग्रामपंचायत सदस्य ते पंतप्रधानपर्यंत काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा एक पाऊल जमीनीवर आणि एक पाऊल कोर्टात अशी वेळ आमची होती. युती झाली म्हणून तुमच्यासोबत आमचा झेंडा लागला पाहिजे असं भाजपचे नेते म्हणायचे, तेव्हा त्यांच्याकडे झेंडाही नसायचा पण युती होती म्हणून आम्ही यांचे झेंडे बनवलेले आहेत. पुढील सभेसाठी यांचा झेंडा मला जपून ठेवावा लागायचा
ज्या पक्षाकडे झेंडे नव्हते त्या पक्षाच्या नेत्याला दिल्लीच्या पंतप्रधानपदाची गादी देण्याच काम बाळासाहेबांनी केलं असल्याची टीका भास्कर जाधव यांनी यावेळी बोलताना केलीयं.
गुजरातचे दहशतवादविरोधी पथक मुंबईत; अटक झालेले मौलाना मुफ्ती सलमान अझहरी कोण आहेत?
तसेच आज बाळासाहेब नाहीत म्हणून शिवसेना संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 2014 साली सेनेचे 63 आमदार निवडून आले होते. त्यानंतर 2019 साली अमित शाह मातोश्रीवर आले होते . शिवसेना पक्ष चोरण्याचं काम झालं आहे. शिवसेना संपवण्याची कूटनीती हे आखतात पण जनता उभी राहुन सोबत असल्याचं सांगतं असल्याचं भास्कर जाधव म्हणाले आहेत.
चिपळूण उद्धव ठाकरेंचं आजोळ आहे. 1994 साली माॅंसाहेब चिपळूणला आल्या होत्या. त्यावेळी माझ्या घरीही आल्या होत्या. भास्कर इथं माझं माहेर आहे, असं त्या म्हणाल्या होत्या. मी मातोश्रीवर गेल्यावर त्या म्हणायच्या माझ्या माहेरुन माणसं आली आहेत. उद्धव ठाकरे चिपळूणचे नातू आहेत त्यामुळे त्यांच्यामागे उभं राहण्याची आपली जबाबदारी असल्याचंही भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे.