मंत्रिमंडळात किती लाडक्या बहिणी? जाणून घ्या, किती महिला आमदार होणार मंत्री..

मंत्रिमंडळात किती लाडक्या बहिणी? जाणून घ्या, किती महिला आमदार होणार मंत्री..

Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा आज (Maharashtra Cabinet Expansion) सायंकाळी पार पडला. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी एकूण ३९ आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यामध्ये ३३ आमदारांना कॅबिनेट तर सहा आमदारांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यामध्ये तीन महिलांनाही संधी मिळाली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे यांना मंत्रि‍पदाची संधी मिळणार आहे.

नागपूर शहरातील राजभवनात (Nagpur) शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी भाजपाच्या १९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ११ आमदारांनी तर अजित पवार गटातील ९ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीतील एकूण ३३ आमदारांनी कॅबिनेट तर सहा आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह वरिष्ठ नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शपथविधीच्या तोंडावर शिंदेंना धक्का! मंत्रिपद न मिळाल्याने आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांत भारतीय जनता पार्टीच्या चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि संजय सावकारे यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, भरत गोगावले आदींनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली.
मंत्रिपदासाठी नावं निश्चित करण्यात आली. प्रसारमाध्यमांतून संभाव्य मंत्र्यांच्या याद्याही व्हायरल होऊ लागल्या होत्या. आज सकाळपासूनच भावी मंत्र्यांना शपथ घेण्यासाठी फोन केले जाऊ लागले होते. त्यानंतर राजभवनात हजेरी लावत पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube