आमचं नाव न घेणाऱ्याला असं इंजेक्शन टोचा की… डॉक्टरांच्या मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य

आमचं नाव न घेणाऱ्याला असं इंजेक्शन टोचा की… डॉक्टरांच्या मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य

Ajit Pawar : लोकसभेच्या या रणधुमाळीत सर्वच पक्षाचे नेते जोरदार प्रचाराला लागले आहेत. जो-तो नेता आपल्या पद्धतीने पचाराची जबाबदारी पार पाडत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून जोमाने प्रचाराला लागल्याचं पाहायला मिळालं आहे. (Ajit Pawar) आज अजित पवारांनी इंदापूर (Baramati loksabha) येथील डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्याला संबोधित केलं. (Loksabha Election) यावेळी बोलताना, त्यांनी विरोधकांवर काही थेट टीका तर काही मिश्किल भाष्य करत हा मेळावा गाजवला.

 

 

500 वर्षात जे होऊ शकलं नाही ते मोदींनी केलं

यावेळी बोलताना, अजित पवार यांनी उपस्थित डॉक्टर आणि वकिल मित्रांनो आपण एक भारतीय नागरिक म्हणून विचार करा, एका बाजूला नरेंद्र मोदींचा चेहरा पंतप्रधान म्हणून आहे तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींचा चेहरा आहे. ही काय परिस्थिती आहे. तसंच, यांनी आत्तापर्यंत काय काम केलं असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी राहुल गांधीवर अप्रत्यक्ष टीका केली. तर, 500 वर्षात जे होऊ शकलं नाही ते रामाचं मंदिर मोदींच्या काळात झाल असं म्हणत मोदींनी अनेकांचं हे स्वप्न पूर्ण केलं, अशा शब्दांत मोदींची स्तुतीही त्यांनी केली.

 

 

उपमुख्यमंत्री व्हायला तेवढ्या वेळा निवडूनही यायाला पाहिजे

दरम्यान, अजित पवार यांनी या मेळव्यात बोलताना आपली ताकद दाखवण्याचाही एकप्रकारे प्रयत्न केला. अजित पवार म्हणाले, मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मी राज्याचा अर्थमंत्री आहे आणि मी उपमुख्यमंत्रीही आहे. तसंच, आम्ही महायुतीत सरकारसोबत गेलो ते कामासाठीच गेलो आहोत असा दावाही त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर मी पाच ते सहा वेळेला उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आहे. मला नाही वाटत हा रेकॉर्ड कोणी तोडेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच, इतक्या वेळा उपमुख्यमंत्री व्हायला तेवढ्या वेळा निवडूनही यायाला पाहिजे असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

 

 

असं इंजेक्शन टोचा की

या मेळाव्यात डॉक्टर असल्याने अजित पवार यांनी त्यांच्याशी मिश्किल संवाद साधला. त्यामध्ये अजित पवार डॉक्टरांना म्हणाले, तुम्ही सहज खूप काही काम करू शकता. माणूस खर कोणाशी बोलत असेल तर डॉक्टरांशी. कारण काय वेदना होतात हे सांगितल्याशिवाय त्यावर उपचार होत नाहीत. मात्र, हे उपचार करताना त्याला थोड बोला की काय चाललय, मनात काय आहे. असं सगळ बोलताना पेशंटने जर आमच नाव घेतलं तर त्याला चांगली वागणूक द्या. मात्र, दुसरं काही नाव घेतलं तर त्याला असं इंजेक्शन टोचा की असं म्हणत सॉरी मला असं काही म्हणायच नाही असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube