भ्रष्टाचाराचे आरोप का झाले? अजितदादांच्या सूचक शब्दांचा रोख कुणाकडे..

भ्रष्टाचाराचे आरोप का झाले? अजितदादांच्या सूचक शब्दांचा रोख कुणाकडे..

Ajit Pawar : महायुती सरकारमध्ये आल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीनंतर राज्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget) अजितदादांनी राज्य सरकारच्या कामकाजाची माहिती दिली तसेच अनेक नवीन योजनांची घोषणा केली. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून प्रचंड टीका केली जात आहे. अजित पवार यांनाही टार्गेट केले जात आहे. त्यामुळे आज स्वतः अजित पवार यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत भूमिका स्पष्ट केली आहे तसेच भ्रष्टाचाराचे खोटे आरोप का झाले याचंही उत्तर देऊन टाकलं.

‘मी कधीच पक्ष बदलला नाही, तुमचा दादा काम करणारा’ अजितदादांचं विरोधकांना सणसणीत उत्तर

काय म्हणाले अजित पवार ?

काही दिवसांपूर्वी मी अर्थसंकल्प सादर केला. राज्याचा ऐतिहासिक अर्थसंकल्प मांडण्याचं भाग्य मला लाभलं याचा मला अभिमान आहे. आता या अर्थसंकल्पावर अकारण टीका केली जात  आहे. काहींनी अर्थसंकल्पाला लबाडा घरचं आवतण म्हणून हिणवलं आहे. मला इतकंच सांगायचं आहे की या लोकांमध्ये आणि माझ्यात एकच फरक आहे. तो म्हणजे त्यांना फक्त राजकारण करायचंय पण तुमचा दादा काम करणारा आहे असे अजित पवार म्हणाले.

भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण सिद्ध झाले नाही

माझ्या कामांची यादी खूप मोठी आहे. ज्यांना आठवत नसेल त्यांनी जरुर माहिती घ्यावी की या विकासकामांची सुरुवात कुणी केली. या सगळ्यात तुम्हाला तुमचा दादाच दिसेल याची मला खात्री आहे. जो जास्त काम करतो त्यालाच जास्त त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच मधल्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप झाले. पण यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही आणि भविष्यातही कधीच होणार नाही, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

Nawab Malik : महायुतीमध्ये पुन्हा वाद? नवाब मालिकांची अजित पवार गटाच्या बैठकीला हजेरी

माझा दोष इतकाच आहे की..

मी राज्यातील गोरगरीब जनतेला तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. पण या बदल्यातही मला शिव्या शाप मिळतात. माझा दोष फक्त इतकाच आहे की मी शेतकऱ्यांची दुःखं आणि त्यांच्या वेदना समजून घेतल्या. सरकारच्या योजनांच्या माध्यमातून या वेदनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला असेही  अजित पवार यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज