नितेश राणेंना धक्का, कोर्टाने बजावलं अजामीनपात्र वॉरटं; नेमकं काय घडलं?

नितेश राणेंना धक्का, कोर्टाने बजावलं अजामीनपात्र वॉरटं; नेमकं काय घडलं?

Nitesh Rane : भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या (Nitesh Rane) आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी  (Sanjay Raut) दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्या प्रकरणी न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यामुळे आता राणेंना जर अटक टाळायची असेल तर येत्या 17 ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयात हजर राहावेच लागणार आहे. खासदार संजय राऊत यांनी अॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली होती. मात्र नितेश राणे या सुनावणीला हजर राहिले नाहीत.

एका ढ विद्यार्थ्याने अर्थसंकल्पावर ज्ञान पाजळणे हास्यास्पद; नितेश राणेंचा राऊतांना टोला

भाजप आमदार नितेश राणे पक्षाची बाजू अतिशय जोरकसपणे मांडतात. ठाकरे गटावर तर अगदी सडकून टीका करतात. टीका करताना त्यांनी जे शब्द निवडलेले असतात ते नेहमीच ठाकरे गटाच्या नेत्यांना टोचणारे असतात. संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली की त्याला उत्तर देण्यासाठी नितेश राणे सुद्धा पत्रकार परिषद घेतात. हा नित्यक्रम बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. संजय राऊत भाजप आणि महायुती सरकारवर जे आरोप करतात त्याची उत्तरे नितेश राणेंकडून दिली जातात. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे या तिघांवर त्यांचा टीकेचा रोख असतो.

आता मात्र नितेश राणेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीला आमदार राणे हजर राहत नाहीत. मंगळवारी झालेल्या सुनावणीलाही हजर राहिले नाहीत. हजेरीपासून त्यांना सुट मिळावी अशी विनंती त्यांच्या वकिलांनी कोर्टात केली होती.

मात्र वारंवार गैरहजर राहणाऱ्या नितेश राणेंना दिलासा देण्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी नकार दिला आणि अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. राणेंना याआधीही वॉरंट बजावण्यात आले होते. त्यानंतरही राणे गांभीर्याने वागत नसल्याचे पाहून न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. आता न्यायालयाने त्यांना पुन्हा अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. यानंतर तरी नितेश राणे हजर राहणार का? पुढे न्यायालय काय निर्देश देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले तर तुमचं वस्त्रहरण होईल; नितेश राणेंचा महाविकास आघाडीला इशारा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube