मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? तटकरेंनी थेट दिवसच सांगून टाकला
Maharashtra Cabinet Expansion : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदरांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन दहा दिवस उलटून गेल्यानंतर खातेवाटप (Maharashtra Cabinet Expansion) झालेले नाही. शिंदे गटाचे आमदार तर मागील एक वर्षापासून मंत्रीपदाची वाट पाहत आहेत. खातेवाटपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात आज महत्वाची बैठक झाली मात्र,या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही. आता ही नेतेमंडळी दिल्लीत जाऊन भाजप श्रेष्ठींची भेट घेणार असल्याचे सांगितले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) सुनील तटकरे यांनी थेट मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखच जाहीर करून टाकली.
खातेवाटपाचं कोडं! दादांची भूमिका ठाम, CM शिंदेंसह फडणवीस, पवार दिल्लीत
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माध्यमांत विविध चर्चा होत असतात. मात्र आम्ही सर्वांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. वेळेत थोडा उशीर होऊ शकतो. पण कोणत्याही प्रकारचा गैरसमज मनात न आणता सर्वांनी पुढे जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्री या संदर्भातील निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत झालेला पाहण्यास मिळेल, असे तटकरे म्हणाले.
राज्यात काही दिवसांपासून राजकीय अनपेक्षित घडामोडी घडल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला मंत्रिमंडळ विस्ताराला उशिर होणार असल्याचं दिसून येत आहे. कारण अजित पवार गटाने महत्वाच्या खात्यांवर बोट ठेवलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मोठं कोडं पडलं आहे.हेच कोडं सोडवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि पवार हे दिल्लीला गेले आहेत.
अजित पवार गटाला दिलेले आश्वासन पूर्ण होत नसल्यानं खातेवाटपाचा तिढा; रोहित पवारांचे टीकास्त्र
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाला. आधीच शिंदे गटाने भाजपशी युती केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त लागलेला नव्हता, आता सत्तेत अजित पवार यांचा गट सामिल झाल्याने मंत्रिमंडळ विस्तारात अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये अनेकदा बैठका झाल्या आहेत. मात्र, अद्यापही खातेवाटपाच कोडं जैसेथेच आहे.