‘पंतप्रधान होण्याचं फडणवीसांचं स्वप्न पण, मोदी-शहांनी पंख छाटले’; राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut comment on Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक खळबळजनका दावा केला आहे. ज्याची आता राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान होण्याचं देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न होतं. मात्र मोदी शहांनी त्यांचे पंख छाटून त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री केले, असा दावा संजय राऊत यांनी केला. दरम्यान, याआधी उद्धव ठाकरे यांनीही आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार होते असा दावा एका मुलाखतीत केला होता.
‘उगाच स्क्रिप्ट करण्याच्या भानगडीत पडू नका, जशास तसं उत्तर देऊ’ फडणवीसांचं ठाकरेंना तिखट उत्तर
राऊत पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांबाबत जे सांगितलं ते खरंच आहे. आधी ज्यावेळी आमची चर्चा झाली त्यावेळी ते म्हणाले होते, की आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावर बसवून मी दिल्लीला जाईन. मी दिल्लीत अर्थमंत्री, पंतप्रधान होईन इतके मोठे स्वप्न फडणवीसांचे होते. जर फडणवीसांचं मराठी माणसाचं स्वप्न असेल तर आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीशी राहू. पण, मोदी शहांना त्यांचं हे स्वप्न आवडलं नाही. त्यांनी फडणवीसांचे पंख छाटले आणि त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री केलं. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या ज्युनियर नेत्याच्या हाताखाली त्यांना ठेवलं, असे राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे देखील पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याचे राऊत म्हणत असतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरही राऊतांनी भाष्य केले. आम्हाला नेमकं काय बोलायचं असतं हे काँग्रेसला कळत नाही. त्यामुळे नाना पटोले यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची काहीच गरज नाही, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीला धक्का, कुलदीप कोंडे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र!
जशास तसं उत्तर देऊ : फडणवीस
दररोज एकेक कपोलकल्पित कथानक तयार करून कुणाची दिशाभूल करता? स्वतःचीच ना? महाराष्ट्राचे समाजकारण आणि विकास ही काही सलीम-जावेदची स्क्रिप्ट नाही. समाजकारणाचा आणि विकासाचा तुम्हाला गंध नसला तरी उगाच अशा स्क्रिप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका. जशास तसं उत्तर दिलं जाईल! अशा तिखट शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.