गुढी पाडवा होताच वातावरणात मोठा बदल; मुंबई पुण्यासह अनेक शहरांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update : गुढीपाडव्यापासून राज्यामध्ये वातावरणात बदल झाला आहे. (Weather ) अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण झाल्याने गरमी वाढली असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचा अंक कायम; परळी तालुक्यात एकजणाचा दगडाने ठेचून खून, प्रकरण काय?
गुढीपाडव्याच्या दिवशी कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे शहरवासी हैराण झाले. काल रविवारी (ता. ३०) ३९ अंश तापमान नोंदलं गेलं. काहीशा ढगाळ वातावरणामुळे हवेतील आर्द्रता वाढून प्रचंड उकाडा सहन करावा लागला. चैत्र महिन्याला रविवारी (ता. ३०) प्रारंभ झाला.
रविवारी कमाल तापमानाने ३९ अंशांचा पल्ला गाठला. किमान तापमानही २५.४ अंशांवर पोचल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. त्याशिवाय दुपारनंतर ढगाळ वातावरण झाल्याने हवेत दमटपणा वाढला. हवेतील सापेक्ष आर्द्रता ४८ टक्क्यांवर पोचली होती. परिणामी, सोमवारीही उन्हाचा चटका आणि घामाच्या धारा अशी स्थिती राहिली असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गाराच्या पावसाचा अंदाज
रविवार जरी कडक उन्हाचा राहिला असला तरी आगामी तीन दिवसांत मात्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने तापमान काहीसे कमी होईल, असा अंदाज आहे. हवामान खात्याने सोमवारी (ता. ३१) दुपारनंतर पावसाची शक्यता वर्तवली, तर एक आणि दोन एप्रिल रोजी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस किंवा गारा पडण्याची शक्यता वर्तवली. या तीन दिवसांत तापमान ३५ ते ३७ अंशांपर्यंत खाली येईल, असा अंदाज आहे.
ढगाळ वातावरण कशामुळे?
दक्षिण छत्तीसगडपासून महाराष्ट्र, कर्नाटक ते उत्तरअंतर्गत तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान असल्याने राज्याच्या अनेक भागांत ढगाळ हवामान होत आहे. परिणामी, अवकाळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.