गेवराईत भरदिवसा व्यापाऱ्याला घातला गंडा; दोन लाख रुपयांची रक्कम केली लंपास, काय घडल?

Gevrai Crime : कोण कोणत्या मार्गाने चोरी आणि कुणाला गंडा घालेन काही नेम नाही. (Gevrai Crime) अहो साहेब तुमचे पैसे खाली पडले असे म्हणत गेवराईतील एका व्यापा-याचे दोन लाख रुपये लंपास केल्याची घटना मोंढा भागात घडली असून, चोरटे सिसिटीव्हीत कैद झाल्याने पोलीस तपासात गती मिळेल अशी अपेक्षा आहे.
बीडमधील गेवराईतील धोंडराईच्या प्रकाश शेट्टी यांचे गेवराई शहरातील मोंढा भागात बी-बीयाणे तसेच सिमेंट,पत्रा व स्टीलचे दुकान आहे. या दुकानातील मुनीम वैभव लाड यास दोन लाख रुपये बँकेतून आणण्यासाठी पाठवले.
बीडमध्ये पडला दगडांचा पाऊस; गावकऱ्यांमध्ये दहशत, नेमकं घडतंय तरी काय?
लाड याने दोन लाख रुपये बॅक खात्यावरून काढलेली रक्कम एका कापडी पिशवीतून दुकानाकडे दुचाकीवरुन जात असतानाच तोच त्यांच्या दोघे आले अहो साहेब, तुमचे पाचशे रुपये पाठीमागे पडलेत असे म्हणताच मुनीम वैभव लाड याने दुचाकीला अडकलेली कापडी पिशवी तशीच ठेवून गेला.
अन् याच संधीचा फायदा घेत या चोरट्यांनी सदरील पिशवी घेऊन पोबारा केला.दरम्यान,सदरील प्रकार बाजार समितीच्या सिसिटीव्हीत कैद झाला असून, याबाबत गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.