पालकमंत्री तानाजी सावंतांमुळे धाराशिवच्या आरोग्य सेवेचा चेहरा-मोहरा बदलतोय
धाराशिवः आरोग्य सुविधा नसल्याने रुग्णांना दुसऱ्या जिल्ह्यात खासगी हॉस्पिटलला जाऊन उपचार घ्यावे लागतात. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातही तिच परिस्थिती होती. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आरोग्य सेवेचा चेहरा मोहरा बदलण्याचा विडा उचलला आहे. सावंत यांनी राज्यातील इतर सरकारी रुग्णालयांबरोबर आपल्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. नुकताच परंडा येथे शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयाचे भूमिपूजन झाले. तर भूम येथे ही 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपजूनही पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी रुग्णालयांच्या इमारती वेळेत उभा राहू लोकांना आरोग्यसेवा मिळावी, असे सांगितले.
‘सरकार स्थिर राहणार’ म्हणणाऱ्या फडणवीसांवर पवारांचा पलटवार; म्हणाले, निकाल..,
परंडा येथे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय आणि 100 खाटांच्या स्त्री रुग्णालयाचे भूमिपूजन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते झाले आले. दोन्ही इमारतीच्या बांधकामावर 87 कोटी रुपये खर्च करून ह्या रुग्णालयांच्या इमारती तयार होणार आहेत. 50 खाटांच्या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री डॉ.सावंत पुढे म्हणाले, आरोग्य सेवा बळकट करण्यात शासन कमी पडणार नाही. तसेच निधीची कमतरताही देखील पडू देणार नाही. येत्या एका वर्षात हे दोन्ही रुग्णालये जनतेच्या सेवेसाठी सज्ज होतील.
मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही, विधानसभा अध्यक्षांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
डॉ.सावंत म्हणाले, या दोन्ही रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याठिकाणी रक्तपेढी, डायलासिस आणि इतर रोगांवर उपचार केले जातील. रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला काळजीपूर्वक तपासून उपचार देणे बंधनकारक राहील. आवश्यकता नसल्यास इतर ठिकाणी रेफर करण्यावर आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. यावेळी विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ.अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, प्रमुख लोकप्रतिनिधी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. भूममधील तीस खाटांचे महिला रुग्णालयाची मागणी पुढे आली. त्यावेळी सावंत यांनी पंधरा दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल, असे जाहीर करून टाकले.
भूम येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते झाले. या रुग्णालयासाठी 24 कोटी 53 लाखांचा निधी मिळाला आहे. या रुग्णालयाच्या काम चारशे दिवसात करायचे आहे. परंतु या रुग्णालयाचे काम दहा महिन्यांत पूर्ण झाले पाहिजे. जर आम्हाला लोकार्पण सोहळा करण्यासाठी दहा महिन्यात संधी दिले तर कंत्राटदाराला 5 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे सावंत यांनी जाहीर केले आहे.
महिला रुग्णालयाचा प्रश्न तातडीने सोडविला
भूम येथील रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या स्थानिक नेत्यांनी भूम येथील तीस खाटांच्या महिला रुग्णालयाच्या इमारतीचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना या रुग्णालयाचा प्रस्ताव त्वरीत पाठविण्याचे आदेश पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहे. या रुग्णालयाचा प्रश्न अवघ्या पंधरा दिवसात सोडविला जाईल, असे आश्वासनही सावंत यांनी दिले आहे.