डोळे पाणावले, कंठही दाटून आला.. जरांगे पाटील भावूक, म्हणाले, मराठा समाजाची..

डोळे पाणावले, कंठही दाटून आला.. जरांगे पाटील भावूक, म्हणाले, मराठा समाजाची..

Manoj jarange Patil Started Journey Jalna to Mumbai Today : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात लाखो मराठा समाजबांधव मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली (Maratha Reservation) आहे. आंतरवाली सराटी गावात सध्या प्रचंड गर्दी झाली आहे. शेकडो ट्रक, ट्रॅक्टर्स तयार ठेवण्यात आले आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असा निर्धार समाजबांधवांनी व्यक्त केला. मराठा समाजाने सरकारला सात महिन्यांचा वेळ दिला. मात्र अजूनही आरक्षण मिळालं नाही. आता शेवटची आरपारची लढाई आहे. त्यामुळे कुणी घरात राहू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. यावेळी मनोज जरांगे पाटील भावूक झाल्याचे दिसून आले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे स्पष्ट दिसत होते.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आज आम्हाला मुंबईला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आरक्षण मुंबईतच आहे. मी असेन नसेन माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, असे बोलत असताना त्यांचे डोळे पाणावले. कंठ दाटून आला. उपस्थितांनाही गहिवरून आले. 26 तारखेला मराठा समाजबांधवांनी मुंबईला यावं. माझं शरीर मला साथ देत नाही. मी असेन किंवा नसेन पण समाजाची एकजूट फुटू देऊ नका. छातीवर गोळ्या पडल्या तरी माघार नाही, असे जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

Manoj Jarange : अल्टिमेटम संपला! आज मनोज जरांगे मुंबईकडे कूच करणार; प्रशासनही अलर्ट

आंतरवाली सराटीतूनच उपोषण करणार 

सरकारला समाजाने सात महिन्यांचा वेळ दिला मात्र तरीही आरक्षण मिळालं नाही. आम्ही दोन ते तीन खिंडा लढवणार आहोत. मुंबईत तुम्हाला मराठ्यांचा कोटींचा आकडा दिसेल, असे स्पष्ट करत आंतरवाली सराटीतूनच मी उपोषण करत निघणार आहे, अशी मोठी घोषणा जरांगे पाटील यांनी यावेळी केली. आता ही शेवटची आरपारची लढाई आहे. तेव्हा कुणीही घरात राहू नका. मुंबईत जवळपास तीन कोटी मराठा बांधव येतील. यापेक्षाही जास्त लोकं जमली असती मात्र, मुंबईत आलेल्या मराठ्यांच्या मदतीसाठी काही लोकांनी मागं राहावं असे ठरवलं आहे. किती लोकं जमणार हे आम्हाला दाखवायचं नाही तर आरक्षण मिळवणे हाच आमचा उद्देश आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली महत्वाची बैठक 

दरम्यान, राज्य सरकारही अॅक्शन मोडमध्ये आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. आज दुपारी तीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीला मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महत्वाची चर्चा होणार असल्याचे समजते.

Sangharsyoddha Movie: मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube