“माझं काही बरं वाईट झालं तर..” हत्येआधी संतोष देशमुखांनी काय सांगितलं?, लेक वैभवीचा जबाबात खुलासा

“माझं काही बरं वाईट झालं तर..” हत्येआधी संतोष देशमुखांनी काय सांगितलं?, लेक वैभवीचा जबाबात खुलासा

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने (Santosh Deshmukh Murder Case) महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. वाल्मिक कराड या (Walmik Karad) प्रकरणात क्रमांक १ चा आरोपी असल्याचा उल्लेख दोषारोपपत्रात करण्यात आला आहे. यातच आता पाच गोपनीय साक्षीदारांनी थेट वाल्मिक कराडचं नाव घेतल्याने पोलिसांचा तपास आणखी सोपा झाला आहे. यानंतर आता संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखचा जबाब समोर आला आहे. यामध्ये तिने वडिलांचे शेवटचे शब्द काय होते हे सांगितलं आहे.

माझं काही बरं वाईट झालं तर आई आण विराजची काळजी घे. इतकं काही नाही कशाला ताणता भाऊ, एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर उठता का? पप्पांचा हा फोन दहा ते बारा मिनिटे सुरू होता असे वडिलांनी मला सांगितले होते, अशी माहिती वैभवी देशमुखने आपल्या जबाबात दिली आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

या जबाबात दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख यांचे अपहरण होण्याच्या एक दिवस आधी त्यांना विष्णू चाटेचा फोन आला होता. यानंतर या फोनमध्ये काय संभाषण झालं याची माहिती संतोष देशमुख यांनी मुलगी वैभवीला दिली होती.

पाईपचे 15 तुकडे , पोटावर बेदम मारहाण , नाकामधून रक्त अन्.. संतोष देशमुखांचा PM अहवाल समोर

वैभवीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की माझे पप्पा मस्साजोगमधून लातुरला आले होते. त्या दिवशी ते काहीसे अस्वस्थ होते. दुसऱ्या दिवशीही पप्पा मला काळजीत दिसले. काय झालं म्हणून मी विचारलं. त्यावेळी ते मला म्हणाले बाळा चांगला अभ्यास कर.. मी त्यांना विचारलं काय झालं पप्पा. तरीही ते काही सांगण्यास तयार नव्हते.

वारंवार विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की 6 डिसेंबरला अवादा कंपनीत वाल्मिक अण्णांची माणसे खंडणी मागण्यासाठी आले होते. मी त्यांना अडवलं होतं. याचा त्यांना राग आला होता. वाल्मिक कराडच्या जवळचा माणूस विष्णू चाटे मला फोन करून ठार मारण्याची धमकी देत आहे. त्यामुळे मला टेन्शन आले आहे. माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे, असे संतोष देशमुख यांनी सांगितलं होतं.

संतोष देशमुखांच्या हत्येचा अखेर उलगडा! काळजाचा थरकाप उडणारा तो क्रूर व्हिडिओ सीआयडीच्या हाती

कृष्णा आंधळे अजूनही फरार

दरम्यान, या हत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृ्ष्णा आंधळे अजूनही फरार आहे. कृष्णा आंधळेचा खून झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. कृष्णा आंधळेनेच संतोष देशमुख यांना मारताना फोटो आणि व्हिडिओ काढल्याचे समोर आले होते. संतोष देशमुख माझे हातपाय तोडा पण मला मुलांसाठी जगू द्या अशी आर्त विनवणी करत होते. पण या आरोपींना त्यांची दया आली नाही. आरोपी त्यांना मारहाण करतच राहिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube