नांदेड : संभाजीराजे छत्रपती यांनी स्थानिक प्रश्नांसोबतच विधानसभेत होत असलेल्या गदारोळाविषयी भाष्य करताना सरकारसह विरोधकांवर निशाना साधला. शुक्रवारी शेतकरी दिन असून देखील शेतकऱ्यांसाठी सरकार काहीही करत नसल्याचे भाष्य संभाजीराजे छत्रपती महाराजांनी केले. हिवाळी अधिवेशन म्हणजे जनतेच्या पैश्यांची नासाडी असल्याची जोरदार टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली संभाजीराजे छत्रपती महाराज यांच्या स्वराज्य संकल्प अभियानाच्या दोन दिवसीय नांदेड […]
बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोळण औरंगपूर ग्रामपंचायत निवडणुकीत, अवघ्या 21 वर्षाची तरुणी सरपंच पदी विराजमान झालीय. भारती मिसाळ असं या तरुणीचे नाव असून बारामतीत कृषी पदवीचं ती शिक्षण घेत आहे. 684 मताधिक्यानं ती निवडून आली असून आज गावात तिची मिरवणूक काढून गावच्या लेकीचं कौतुक करण्यात आले. यंदा झालेली ग्रामपंचायत निवडणुक नेत्यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. […]
नागपूर : ‘टीईटी’ घोटाळ्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नातील सत्तारुढ पक्षातील मंत्र्याशी आणि आमदारांशी संबंधित दोन भाग परस्पर वगळल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात संताप व्यक्त केला. विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर असून सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही, त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करुन त्याची माहिती सभागृहात […]
नागपूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातील लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला सपशेल नाकारले आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रीया काँग्रेस […]
बीड : जिल्ह्यातील काका पुतण्याच्या लढतीत पुन्हा पुतण्यानं बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वादानंतर बीड तालुक्यातील नवगण राजुरीकरांनी संदीप क्षीरसागर यांच्याच गटाला झुकतं माप दिलंय. ग्रामपंचायत निवडणूक निकालात आज संदीप क्षीरसागर गटाच्या सरपंचपदासह सर्व सदस्यांनी एकतर्फी विजय मिळविलाय. जिल्ह्याच्या राजकारणावर एकेकाळी अधिराज्य असलेल्या दिवंगत लोकनेत्या […]
बीड : परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत आतापर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीपैकी राष्ट्रवादीने सर्वाधिक 28 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पक्षाला फक्त 12 ठिकाणी विजय मिळवता आल्याचं पाहायला मिळतंय. परळी विधानसभा मतदारसंघातसर बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवल्यानंतर आमदार धनंजय […]