आता लाख मराठाऐवजी, एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणावं; पंकजा मुंडेंचं जरांगेंना आवाहन

  • Written By: Published:
आता लाख मराठाऐवजी, एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणावं; पंकजा मुंडेंचं जरांगेंना आवाहन

Pankaja Munde : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला काल (दि. २७ जानेवारीला) यश आलं. जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. तसा अध्यादेशही काढला. यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही यावर प्रतिक्रिया देतांना मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन केलं. आता मराठा समाजाची एक पिढी कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आली. आता त्यांनी एक मराठा लाख मराठा ऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावे, असे आवाहन त्यांनी केलं.

`लष्कर-ए- देवेंद्र`चे कमांडो कोण आहेत? घ्या जाणून! 

आज माध्यमांशी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाला की, जरांगे पाटलांचं अभिनंदन. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र अत्यंत तणावपूर्ण वातावरणातून जात होता. अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू होता. आजवर अनेक आंदोलनं झालीत. मात्र, जरांगेच्या आंदोलनाचा परिणाम झाला. मराठा आरक्षणासाठी शासनाने अधिसूचना जारी केली. त्यात मराठा समाजाच्या एका मागणीवर प्रकाश टाकण्यात आला. यात सगेसोयऱ्यांची व्याख्या केली. त्यानुसार, मराठा समाजाला कुणबी दाखले मिळतील, असं मुंडे म्हणाल्या.

Bihar Politics : नितीश कुमार नवव्यांदा बिहारचे CM; भाजपाच्या तिघांनी घेतली शपथ

मुंडे म्हणाल्या, ओबीसींना धक्का न देता मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केली होती. मात्र, कालच्या अधिसूचनेमुळं ओबीसी आरक्षणाला धक्का लागला. आता या अधिसूचनेला १६ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी आहे. त्यामुळं जरांगे पाटलांना कायद्याच्या लढाईसाठी शुभेच्छा. तसंच, ओबीसींनीही शुभेच्छा. कारण ते त्यांचं मत मांडणार आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पुढं बोलतांना त्या म्हणाल्या, अनेकांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र घेतलेले आहेच. पूर्वी विदर्भातील लोकांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र घेतले. पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनीही घेतले. मात्र मराठवाड्यातील नागरिकांनी ते घेतले नाही. मात्र पुढील पिढीसाठी त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र हवे आहे. त्यामुळं ओबीसी आरक्षणाला धक्का लागला आहे. जर सत्तेतील लोक म्हणत असतील की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही तर तो धक्का कसा लागला नाही, हे त्यांनी समजून सांगावं, असं आव्हान मंडेंनी केलं.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही, असं म्हणणं योग्य नाही. मात्र, ओबीसींनी संयमाची भूमिका घेतली आहे. जरांगेंसह अनेकांना ओबीसीमध्ये सामावून घेतलं आहे. त्यामुळं आता एक मराठा, लाख मराठा ऐवजी एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणावं आणि दोन समाजातील वितुष्ट संपवावं. आरक्षण घेऊनही मनानं ओबीसी झाले नाहीतर फायदा होणार नाही, असं मुंडे म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube