78 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या तक्रारीने पाचशे जण कोमात; सुरेश धसांचा पेनड्राइव्ह ‘बॉम्ब’ अन् लेखी तक्रारही करणार

Suresh Dhas On DPDC Meeting: या प्रकरणाची लेखी तक्रार करण्यास अजित पवार यांनी सांगितले असून, लेखी तक्रार करणार आहे.

  • Written By: Published:
Suresh Dhas

Suresh Dhas On DPDC Meeting : बीड जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) निधीतील 78 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केलाय. बीडचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली आहे. या बैठकीत आमदार धस यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय. तसेच अजित पवार यांना भ्रष्टाचाराचे पुरावे पेन ड्राइव्हमधून दिले आहेत. या प्रकरणाची लेखी तक्रार करण्यास अजित पवार यांनी सांगितले असून, लेखी तक्रार करणार आहे. या तक्रारीनंतर पाचशे जण कोमात जातील, असा दावा आमदार सुरेश धस यांनी केलाय.

बीडची बदनामी अन् अजितदादांसमोरच मुंडे, धस, सोनावणेंमध्ये बाचाबाची; जिल्हा नियोजन बैठकीत घडलं काय?

सुरेश धस म्हणाले, बिंदू नामावलीवरील मुद्दा माझा अजूनही कायम आहे. तो मुद्दा मी आजही बोललोय आहे. तो मुद्दा अजितदादांच्या कानावर घातला आहे. जिल्ह्यात अतिरिक्त लोक झाले आहेत. काही लोक करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल ठेवतात, साडी घालतात. पोलिसाकडे पंधरा जेसीबी, हायवा आहे. बीडमधील काही पोलिसांकडे स्वत:चे हायवा ट्रक आहेत. कलेक्टर ऑफिसला लावलेल्या हायवा पोलीस काढून नेतात. माझे म्हणणे आहे पोलिसांनी नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचा धंदा करावा. परळीतील जे काही पोलीस चुकीचे वागले आहेत, त्यांनी पोलिसपदाचा राजीनामा द्यावा आणि गुंडांच्या टोळ्या काढाव्यात, अजून काय झंटा फंटा करायचे ते करावे.
Video : धसांकडून मोहीम फत्ते; जरांगेंची उपोषण स्थगितीची घोषणा; पण, आता लढाई समोरा-समोर…

78 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अजितदादांच्या पीएला काल पेन ड्राइव्ह दिला आहे. नुसता पेन ड्राइव्ह देऊन उपयोग नाही. त्याची लेखी तक्रार करणार आहे. त्यावर उपसचिव दर्जाचे अधिकारी नेमून चौकशी केली जाईल. या प्रकरणात स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल. ७३ कोटी बोगस उचलले आहेत. त्यात पाचशे लोक कोमामध्ये गेले आहेत.

किरकोळ वादावादी

बैठकीमध्ये किरकोळ वादावादी झाली आहे. एकमेंकाबद्दल बोलले आहोत, फार विशेष भांडण झाले नाही. हे गुद्द्याचे भांडण नाही हे मुद्याचे भांडण आहे. संतोष देशमुख खुनापासून बाजूला हटणार नाही. महादेव मुंडे व संतोष देशमुख खुनाबाबत समझौता होणार नाही, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube