कोपरगावमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; आमदार आशुतोष काळे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

आमदार आशुतोष काळे यांच्याकडून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोपरगावमधील अवैध धंदे रोखण्यासाठी सविस्तर निवेदन.

  • Written By: Published:
Untitled Design (75)

MLA Ashutosh Kale’s statement to Chief Minister Devendra Fadnavis : कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरात वाढलेल्या अवैध धंद्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून पोलीस मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत आमदार आशुतोष काळे(Aashutosh Kale) यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांचे लक्ष वेधून अवैध धंदे रोखण्यासाठी त्यांना सविस्तर निवेदन दिले आहे. कोपरगाव (Kopargaon) मतदार संघात मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे अवैध धंदे खुले आम सुरू आहेत. या अवैध धंद्यांना रोखण्याचे काम पोलिसांचे आहे. मात्र पोलीस प्रशासनच याकडे साफ दुर्लक्ष करीत असून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे.

त्याचा नागरिकांना होत असलेला त्रास व नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी यापूर्वीच बुधवार (दि.03) रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून कोपरगाव मतदार संघासह शहरात वाढलेल्या अवैध धंद्याबाबतची माहिती देवून त्याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे लेखी निवेदनात नमूद करून वाढलेल्या अवैध धंद्याला आळा बसावा याबाबत सविस्तर निवेदन दिले होते.

Dr. Baba Adhav : कष्टकऱ्यांचा आवाज हरपला! ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन

सोमवार (दि.08) पासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून आमदार आशुतोष काळे या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला गेले आहेत. त्याठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांनी पुन्हा एकदा कोपरगाव मतदार संघाच्या अवैध व्यवसायाला आळा बसावा यासाठी लेखी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवदेनात पोलीस प्रशासन अवैध व्यवसायाकडे डोळेझाक करीत अवैध व्यवसायाची पाठराखण करीत आहे. मतदार संघासह कोपरगाव शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गुन्हेगारीचा आलेख देखील वाढला आहे.

त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होवून कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या वाढलेल्या अवैध धंद्यावर तातडीने प्रतिबंध लावावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या लेखी निवेदनात केली आहे. त्याबाबत लवकरच कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

follow us