विजयाचे श्रेय मराठा समाजाचे, सध्या आंदोलन स्थगित करतोय’; जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

विजयाचे श्रेय मराठा समाजाचे, सध्या आंदोलन स्थगित करतोय’; जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाला आज मोठे यश मिळाले. मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मान्य झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत (Eknatgh Shinde) उपोषण मागे घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. यानंतर त्यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या विजयाचे संपूर्ण श्रेय मराठा समाजाला (Maratha Reservation) दिले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून वाशीकडे रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते येथे पोहोचतील त्यानंतर जरांगे पाटील उपस्थित समाजबांधवांना संबोधित करणार आहेत.

Manoj Jarange : मराठा आरक्षण मार्गी लागल्यानंतर राजकारणात येणार का? जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सरकारने मोठा संघर्ष केला. आरक्षणासाठी अखेर आम्हाला मुंबईची वाट धरावी लागली. मराठे इतक्या ताकदीने मुंबईत आले की सरकारला आमच्या मागण्या मान्य करून अध्यादेश काढावा लागला. मराठा समाजाच्या ताकदीमुळेच अध्यादेश निघाले आहेत. अन्यथा आदेश निघाले नसते. आंदोलन संपलेले नाही तर सध्या आंदोलन स्थगित करत आहोत, असे जरांगे पाटील म्हणाले.

मराठा समाज मुंबईकडे निघाला तसे अध्यादेश निघत गेले. हा मराठा समाजाचा विजय आहे. गुन्हे मागे घेण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. सगेसोयरे यांच्याबाबतही अध्यादेश काढण्यात आला आहे. सात ते आठ अध्यादेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे आम्ही समाधानी आहेत, असे जरांगे पाटील म्हणाले.

‘लोकसभा निवडणूक लढा’ प्रकाश आंबेडकरांचे मनोज जरांगे पाटलांना आवाहन

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube