शिंदे सरकारमध्ये अजितदादांची एन्ट्री; राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह शपथविधी

शिंदे सरकारमध्ये अजितदादांची एन्ट्री;  राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह शपथविधी

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी होणार असून ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनावर आले आहे. इथे ते त्यांच्या विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा देणार असून त्यानंतर त्यांचा छगन भुजबळ यांच्यासह शपथविधी होणार आहे. ( Ajit Pawar Oath with Devendra Fadanvis and Eknath Shinde ) यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 30 ते 40 आमदार असल्याची माहिती आहे. यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 9 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

NCP : अजितदादांच्या घरी खलबतं! शरद पवार म्हणाले, बैठकीची मला माहितीच नाही

यावेळी शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे  प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि नरहरी झिरवाळ हे देखील राजभवनात उपस्थित  आहे. या शपथविधीला शरद पवारांचा पाठिंबा नसल्याची माहिती आहे. यावेळी अजित पवार यांच्यासह धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, आदी राष्ट्रवादीचे नेते राजभवनावर दाखल झाले आहे. तसेच भाजपचे व शिवसेनेचे सर्व आमदार यावेळी राजभवनावर दाखल झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कोणते 9 जण मंत्रीपदाची शपथ घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar : रोहित पवारांचा अजितदादांना चकवा! बंडाला मारली दांडी

अजित पवार,छगन भुजबळ, दिलीप वळसे, हसन मुश्रीफ, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटिल, संजय बनसोड, धनंजय मुंडे हे नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, शरद पवार यांना मात्र या बैठकीची माहितीच नसल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांनी स्वतः पुण्यातील मोती बागेत आयोजित पत्रकार परिषदेत याचा खुलासा केला. अजित पवार यांनी बैठक बोलावली याची मला माहिती नाही असे उत्तर त्यांनी पत्रकारांना दिले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube