पडळकर म्हणतात, ‘पवारांचा जमिनी लुटायचा छंदच’; रोहित पवारांचं कर्जतचं निवासस्थान वादाच्या भोवऱ्यात?

पडळकर म्हणतात, ‘पवारांचा जमिनी लुटायचा छंदच’; रोहित पवारांचं कर्जतचं निवासस्थान वादाच्या भोवऱ्यात?

Mla Gopichand Padalkar : पवारांचा पहिल्यापासूनच जमीनी लुटायचा छंदच असून हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित असल्याचा खोचक टोला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Mla Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) कुटुंबाला लगावलायं. दरम्यान, कर्जतचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी निवासस्थानाच्या जमीनी प्रकरणी फसवणूक केली असल्याचा गंभीर आरोप पडळकर यांनी केलायं. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असून सभागृहातही हा विषय मांडणार असल्याचं पडळकरांनी स्पष्ट केलयं.

Maharaj ची जागतिक कामगिरी; अनेक देशांत नॉन-इंग्लिश टॉप टेन लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर

नेमकं प्रकरण काय?
कर्जत तालुक्यात आमदार रोहित पवार यांचं निवासस्थान आहे. या निवासस्थानाची जमीन त्यांनी बारामती अॅग्रो कंपनीच्या नावे कृष्णा जायभाय यांच्याकडून 2021 साली घेतली होती. या 2 एकर जमीनीचा 52 लाख रुपयांना व्यवहार झाला होता. मात्र, पवारांनी जायभाय यांना जमीनीचा एकही रुपया दिला नव्हता, मात्र, व्यवहारापोटी त्यांना चेक दिला होता. दुसऱ्या दिवशी हा चेक बाऊंस झाला. घडलेल्या प्रकाराबाबत कारखान्याचे संचालक सुभाष घोळवे यांना संपर्क केला मात्र, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर 2023 साली पवारांनी ही जमीन अडीच कोटी रुपयांना विकून जायभाय यांच्या खात्यावर 52 लाख रुपये ट्रान्सफर केले मात्र, दोन वर्षानंतर पैसे मिळाल्याने जायभाय यांनी जमीनीचे पैसे परत केले. या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याची याचिका जायभाय यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीयं.

दिग्गजांची नावे घेत अजितदादांसाठी उमेश पाटील विरोधकांना भिडले; भाजपलाही दिली आठवण

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
कृष्णा जायभाय सकाळी माझ्याकडे न्याय मिळावा या भावनेतून आले होते. त्यांनी माझ्याकडे जमीनीच्या व्यवहारासंदर्भातील सर्वच कागदपत्रे दिलेले आहेत. पवार यांना जमीनी लुटायचा पहिल्यापासून छंद आहे हे राज्याला माहिती आहे. त्यांना संस्थाने, रामोशी वतने, सरकारच्या जमीनी लुटायचा त्यांना नाद आहे. या प्रकरणी कोर्टात दावा दाखल केल्यानंतर कोर्टानेही फसवणूक झाल्याचं सांगितलं आहे. पवारांचा मूळ डीएनए लबाडीचा, लुटण्याचा, आणि भ्रष्टाचाराचा आहे, रोहित पवार तिथले आमदार असल्याने प्रशासकीय अधिकारी जायभाय यांची दखल घेत नाहीत. मात्र, मी सभागृहात हा विषय मांडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचं पडळकरांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर जायभाय कुटुंब रोहित पवार यांच्या कुटुंबियांकडे गेले असता, ही जमीन रोहित पवार यांच्या राशीला जमत नाही, असं आईवडिलांकडून सांगण्यात आल्याचा दावा जायभाय कुटुंबियांकडून करण्यात आलायं. एका बाजूला हे देव मानत नाही अन् दुसरीकडे राशीला जमीन जमत नसल्याचं सांगत असल्याची सडकून टीका गोपीचंद पडळकरांनी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज