Ahmednagar : सुजय विखेंसाठी नगरकरांचं ठरलंय; भाजप नेत्याच्या वक्तव्याने वेगळीच चर्चा…

Ahmednagar : सुजय विखेंसाठी नगरकरांचं ठरलंय; भाजप नेत्याच्या वक्तव्याने वेगळीच चर्चा…

Ahmednagar Lok Sabha : राज्यात चर्चेत असलेली आणखी एक लढत म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याविरोधात महाविकास आघाडीने निलेश लंके यांना तिकीट (Nilesh Lanke) दिलं आहे. लंके यांच्या रुपाने तगडा उमेदवार आघाडीने दिला आहे. या दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यात आता नगर शहरातील भाजप नेत्याने सुजय विखेंबद्दल केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून नगर शहरात कोणाच्या नावाची चर्चा आहे, कोण बाजी मारेल याबद्दल भाजपच्या पदधिकाऱ्याने मोठे वक्तव्य केले आहे. महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचा विजय निश्चित असून यंदाच्या निवडणुकीत अधिक मताधिक्याने ते निवडून येतील असा विश्वास भाजपचे वसंत लोढा यांनी व्यक्त केला.

Ahmednagar Lok Sabha : लंकेंच्या पाठिशी थोरात; विखेंविरोधात संगमनेरात मध्यरात्री खलबतं

वसंत लोढा यांनी सांगितले की, नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना प्रत्येक भागामध्ये मोठ्या प्रमाणात लीड मिळणार आहे. कारण एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) देशभरातील कामाचा प्रभाव खासदारांना निवडून आणण्यास कारणीभूत ठरेल. शिवाय खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी वेगवेगळ्या वार्डात, वेगवेगळ्या नगरसेवकांच्या माध्यमातून केलेली विकासकामे देखील त्यांना मदत करणारी ठरतील.

विखेंनी खासदार निधी व इतर निधीतून प्रत्येक भागात आणून जो काही विकास साधला आहे. जे महानगरपालिका करू शकली नाही, ती नगर शहरातली विकासकामे खासदारांच्या माध्यमातून, पीडब्लूडीच्या माध्यमातून विखेंनी मार्गी लावलेली आहेत. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे नगर शहरात असलेले नेटवर्क, पक्षाचे काम, संघ परिवाराचे काम या सर्व गोष्टींचा विचार केला तर नगर शहर मोठ्या प्रमाणात हिंदुत्वाला मानणारे शहर म्हणून नावारूपास आले आहे.

Ahmednagar loksabha Election : लंकेंचं तळ्यात-मळ्यात तर विखेंकडून निवडणुकीची मोर्चेबांधणी

आगामी काळात देशाच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे विषय आहेत, ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात असा विश्वास नगरवासियांना आहे. त्याचा एक चांगला परिणाम निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल, असे मत वसंत लोढा यांनी मांडले. नगर शहरामध्ये ज्या पद्धतीने मागच्या वेळेस खासदार डॉ. सुजय विखे यांना लीड मिळाले होते. माझ्या दृष्टिकोनातून त्याच्यापेक्षा जास्त लीड भाजपाचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना शंभर टक्के आम्ही मिळवून देऊ असे मत त्यांनी स्पष्ट केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube