Maratha Reservation : …म्हणून नगर बाजार समितीचे भाजीपाला, कांदा विभाग राहणार बंद
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला असोसिएशनने शनिवारी (दि.4 नोव्हेंबर) बंदची हाक दिली आहे. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार आहे. भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष सुनील विधाते, सचिव मोहन गायकवाड व नंदू बोरुडे यांनी दिली आहे.
Shahrukh Khan Birthday : पठाण, जवाननंतर शाहरूख यशाची हॅट्रीक करणार?
शेतकरी पुत्रांच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रभर आंदोलन तीव्र होत असताना असोसिएशनने एक दिवसीय बंदचा निर्णय घेऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. शनिवारी भाजीपाला व कांदा विभागात कोणतेही व्यवहार होणार नसून, कडकडीत बंद पाळला जाणार आहे. या बंदमध्ये सहभागी होण्याचे आडत व्यापारी व शेतकरी वर्गाला असोसिएशनने आवाहन केले आहे. या बंद बाबतचे पत्र तालुका निबंधकांना देण्यात आले आहे.
Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ द्या’मधील अंकुर वाढवे लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन तीव्र केले असून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात दोन दिवसांपासून तोडफोड, जाळपोळ सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने दक्षता घेऊन पोलीस बंदोबस्त वाढविला. नेते, शासकीय कार्यालयांना पोलीस बंदोबस्त आहे. त्यानंतरही आंदोलक दगडफेक करत असून एकूणच वातावरण तणावाचे बनले आहे. यातच जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी रास्तारोको तसेच आंदोलने केली जात आहे.