…तर कोणतीही निवडणूक लढवणार! नगर दक्षिण लोकसभा उमेदवारीवर आमदार लंकेंचे मोठे भाष्य
Ahmednagar : येत्या काळात राज्यात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections)होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. नगर दक्षिण लोकसभा ही चांगलीच गाजणार असल्याचे दिसत आहे. भाजपकडून सुजय विखे (Sujay Vikhe)हे लोकसभेची तयारी करत असतानाच महायुतीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादीचे (NCP Ajit Pawar group)आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)निवडणूक लढवणार का? याबाबत तर्क-वितर्क लावले जात असतानाच खुद्द आमदार लंके यांनी निवडणुकीवर भाष्य केले आहे. वरिष्ठांनी आदेश दिला तर कोणतीही निवडणूक लढू शकतो, असे यावेळी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले.
नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात; दहाव्या परिशिष्टाचा हवाला देत सरोदेंचा आरोप
नगर दक्षिण लोकसभेसाठी अनेक इच्छूक उमेदवार समोर येऊ लागले आहेत. भाजपाकडून कायदा सुजय विखे यांच्याकडून जोरदार तयारी सुरु असतानाच घटक पक्ष असलेले राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी देखील आपण नगर दक्षिण लोकसभेतून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.
शिवसेनेचा निकाल त्यांची बायकोही मान्य करणार नाही, संजय राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल
एकीकडे हे सुरू असतानाच आमदार राम शिंदे यांनी देखील आपण लोकसभा लढवण्यास इच्छूक असल्याचे देखील त्यांनी बोलून दाखवले. महायुतीमध्येच उमेदवारांची यादी ही वाढू लागल्याने महायुतीपुढे पेच निर्माण होऊ लागला आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हेदेखील लोकसभा लढवणार का? याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. निलेश लंके यांना आपण नगर दक्षिण लोकसभा लढवणार का? याबाबत विचारण्यात आले असता, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आमदार लंके म्हणाले की, मी पक्षाचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे. मी ज्या पक्षात काम करतो, त्या पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींनी जर मला आदेश दिला तर मी कोणतीही निवडणूक लढण्यास तयार आहे, असेदेखील यावेळी लंके म्हणाले.
राणी लंके यांच्या उमेदवारीवर बोलताना लंके यांनी सांगितले की, मी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा कार्यकर्ता आहे, मात्र मला लोकसभेच्या निवडणुकीबाबत अद्याप कुठल्याही प्रकारची विचारणा करण्यात आलेली नाही, तसेच याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे देखील लंके यांनी स्पष्ट केले.