EVM वर शंका! विखे कुटुंबीय कोणाशीच प्रमाणिक नाही; खासदार लंकेंचा खोचक टोला

EVM वर शंका! विखे कुटुंबीय कोणाशीच प्रमाणिक नाही; खासदार लंकेंचा खोचक टोला

Nilesh Lanke News : अहमदनगर लोकसभा (Ahmednagar Loksabha) निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांचा पराभव केल्यानंतर विखे यांच्याकडून ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करण्यात आलीयं. सुजय विखे यांच्याकडून 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्याची मागणी केलीयं. त्यावरुन बोलताना निलेश लंके यांनी खोचक टोला लगावलायं.

गणपतीच्या मूर्तीसोबत पोझ देणं हॉलिवूड अभिनेत्रीला पडलं महागात, भडकले नेटकरी, डिलिट केला फोटो

पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले, निवडणूक आयोग व त्यांच्या यंत्रणेवर माझा १०० टक्के विश्वास आहे. लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. विखे कोणाशीही प्रामाणिक नाही, अशी टीका खासदार निलेश लंके यांनी विखे कुटुंबावर केलीयं. दरम्यान, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ४० मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिनची आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी व्हावी असा अर्ज पराभूत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ४ जूनला मतमोजणी पार पडल्यानंतर १० जून रोजी निवडणूक आयोगाकडं केला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला काल एक पत्र लिहून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार इथं आता मॉकपोल होणार आहे.

Indrayani: इंदुचा किर्तनकार म्हणून प्रवास होणार सुरु, ‘इंद्रायणी’ मालिकेतील आषाढी एकादशी विशेष भाग!

सुजय विखे पाटील याबाबत म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणत्याही उमेदवाराला निकाल लागल्यानंतर 7 दिवसांच्या आत एकूण ईव्हीएम मशीनच्या 5 टक्के मशीनच्या मायक्रो कंट्रोलरची तपासणी करता येते त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना ज्या मतदान केंद्रावर तीव्र शंका होती अशा 40 ठिकाणच्या ईव्हीएमच्या मायक्रो कंट्रोलर मशीनची तपासणीची मागणी रीतसर फी ‘जीएसटी’ सह भरून केली असल्याचं सुजय विखेंनी स्पष्ट केलं होतं.

ग्राहकांना धक्का, ऑनलाईन फूड ऑर्डरसाठी मोजावे लागणार जास्त पैसे, जाणून घ्या नवीन दर

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखेंचा २८ हजार ९२९ मतांनी पराभव झाला आहे.लोकसभेच्या ४० केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केलीये. भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी १८ लाख ८८ हजार रुपये भरले आहेत. त्यामुळे आता सुजय विखे यांच्या मागणीनंतर काय उघड होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube