मालेगाव चिमुकलीवर अत्याचार; आरोपीला पोलिस कोठडी, नाशिकमध्ये आज जनआक्रोश…
नाशिकच्या मालेगाव अत्याचार प्रकरणी आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून संपूर्ण शहर बंद ठेऊन निषेध व्यक्त केला जाणार आहे.
Nashik Reape & Murder Case : तीन वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणी (Nashik Reape & Murder Case) आज नाशिक शहरात बंद पाळण्यात येणार असून रामसेतू ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन दगडाने ठेचून मारल्याची घटना मालेगावातील डोंगराळ भागात घडलीं. या घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात असून आरोपीला येत्या 27 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीयं.
या घटनेप्रकरणी तपासी अधिकाऱ्यांना घटनेचा संपूर्ण तपास करण्यासाठी योग्य वेळ दिला गेला पाहिजे, म्हणून पोलिसांनी 7 दिवस आरोपीची पोलिस कोठडी मागितली होती ती पोलिस कोठडी न्यायालयाने मंजूर केली असल्याची माहिती वकीलांनी दिलीयं. तर दुसरीकडे आज रामसेतू ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या जनआक्रोश मोर्चामध्ये शहरवासियांसह मुस्लिम धर्मगुरुदेखील सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलंय.
ब्रेकिंग : राष्ट्रपती अन् राज्यपाल विधेयकांसाठी कालमर्यादा ठरवू शकत नाहीत; SC चा मोठा निर्णय
काल राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी डोंगराळ इथं जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी दादा भुसे यांनी पीडित कुटुंबाचं सांत्वनही केलं. त्यानंतर आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यासोबतच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पीडित कुटुंबियांची भेट घेणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.
द लॅन्सेटचा धक्कादायक अहवाल! मुलांसाठी अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न किती धोकादायक?
दरम्यान, नाशिकच्या मालेगावमधील डोंगराळ येथे एका तीन वर्षीय चिमुकलीवर 24 वर्षीय आरोपीने अत्याचार करुन दगडाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीयं. या घटनेनंतर नाशिकसह संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेमुळे सर्वत्रच संताप व्यक्त केला जात आहे. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे ३ वर्षांच्या मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. या गावामध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाने चिमुकलीसोबत अत्याचार केले.
