नाशिक – महाविकास आघाडीचे सरकार कोसळले त्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होईल. मात्र त्या घटनेचे पडसाद अजूनही राज्याच्या राजकारणात उमटत असतात. राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली की हा मुद्दा चर्चेत येतो. आताही नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे सरकार कशामुळे कोसळले यावर राजकीय नेत्यांकडून टीका टिप्पणी सुरू आहे. या मुद्द्यावर शिवसेनेनंतर (Shivsena) राष्ट्रवादी […]
नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या शिवपिंडीवर काही दिवसांपूर्वी बर्फ जमा होत असल्याचे समोर आले होते. मात्र हा जमा झालेला बर्फ पुजाऱ्यांनी केलेला बनाव असल्याचे चौकशी समितीत उघड झाले आहे. या प्रकरणी पुजाऱ्यासह ट्रस्टच्या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी देवस्थान समितीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, 30 […]
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) नामांतराच्या चर्चा जोरात सुरू असतानाच आता नामांतराच्या मागणीसाठी गुरुवारपासून (दि.९) नगर जिल्ह्यात रथयात्रा सुरू झाल्याने राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. जिल्ह्याच्या नामांतराची आणि विभाजनाची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत चौंडी (ता. जामखेड) या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावापासून रथयात्रेला प्रारंभ होत आहे. या रथयात्रेची राज्याच्या राजकारणात जशी चर्चा होत […]
अहमदनगरः जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला (Medical Officer) लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. डॉ. वृषाली तुळशीराम सूर्यवंशी -कोरडे असे तिचे नाव आहे. आपल्या सहकाऱ्याकडे दहा हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक (ACB)अधिकाऱ्यांनी तिला आज रंगेहाथ पकडले. या प्रकरणातील तक्रारदार या समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस आहेत. त्यांचा ऑगस्ट, सप्टेंबर […]
अहमदनगर : श्रीगोंद तालुक्यातील ढवळगाव येथील माजी सरपंच विजय मारुती शिंदे यांच्यावर दोन जणांनी दुचाकीवरून येत तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ला करून हे हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ढवळगावच्या सरपंच प्रतीक्षा शिंदे यांचे पती माजी सरपंच विजय मारुती शिंदे हे मंगळवारी 7 फेब्रुवारीला […]
अहमदनगर : अंधश्रद्धेला थारा न देता प्रत्येकानं शुद्ध आचार व शुद्ध आहार ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. देवपण येण्यासाठी मोठं कष्ट सोसावं लागत असून आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat)हे सर्वमान्य नेतृत्व आहे. तालुका व जिल्ह्यासाठी हा आपला माणूस आपला स्वाभिमान असल्याचं प्रतिपादन निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivrutti Maharaj Indurikar)यांनी केलंय. वेल्हाळे येथे हरी बाबा मित्र मंडळाच्यावतीनं […]