जळगाव : जळगाव दूध संघाची (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh) नोकर भरती रद्द केल्याची घोषणा भाजप आमदार आणि दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) यांनी केली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadase) यांनी निषाणा साधलाय. राजकीय हेतूनं ही कारवाई केल्याचा आरोप खडसे यांनी चव्हाण यांच्यावर केला आहे. एकीकडं बेरोजगारी, बेकारीचं प्रमाण […]
जळगाव : ग्रामीण भागातून व शहरी भागातून शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांची खाजगी वाहनचालक (Private driver) वाहतूक करत असतात. वेळेवर शाळेत पोहोचता यावे म्हणून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी खाजगी वाहनाने प्रवास करीत असतात. या खाजगी वाहनचालकांकडून चोपडा शहरातील वाहतूक पोलीस (Traffic Police) हप्ते मागतात तसेच हप्ता नाही दिला, तर कोर्टाची नोटीस पाठवतात, अशा प्रकारची तक्रार खाजगी […]
नगर : पाथर्डी तालुक्यातील केळवंडी या खेड्यातील तृप्ती किरण शेटे हिने साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेट्रोची सैर घडवली आहे. मोदींसह मंत्र्यांना मेट्रोतून सैर १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत मेट्रोच्या उद्घाटनासाठी आले होते. मोदींनी ज्या मेट्रोतून प्रवास केला, त्या मेट्रोचे सारथ्य तृप्ती शेटे या तरुणीने केले. याच तरुणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]
नगर : न्यायालयाचे कामकाज ई फायलिंगद्वारे चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ई फायलिंगच्या निर्णयाला अहमदनगर जिल्हा न्यायालयातील सर्व वकिलांचा विरोध आहे. वकील संघटनेने आज या निर्णयाचा निषेध करत लाल फिती लाऊन कामकाज केले. वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड.संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत या बंधनकारक निर्णयास सर्व वकिलांनी जाहीरपणे विरोध केला. तसेच तसा ठराव […]
नाशिक : “देशातील असं एकही राज्य नाही जिथं मी काँग्रेस पक्षाचं संघटनात्मक काम केलं नाही. राज्यातील एकही तालुका आणि गाव नाही, जिथं मी काँग्रेसचं संघटनात्मक काम केलं नाही.” असं वक्तव्य नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी केले आहे. नाशिक येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेसमधून बाहेर पडून सत्यजित तांबे यांनी स्वतः […]
नाशिक: नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने येऊन शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवळाली गाव परिसरात काल सायंकाळी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकात राडा होऊन शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटेंचा मुलगा स्वप्नील याने बंदूक काढत हवेत गोळीबार केल्यामुळे […]